टोकियो, 3 ऑगस्ट : टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) मध्ये पुरुष हॉकीच्या सेमीफायनल (Hockey Men's Semi Final) मध्ये भारत आणि बेल्जियम (India vs Belgium) यांच्यात झालेली मॅच सुरुवातीला खूपच अटीतटीची झाल्याचं पहायला मिळालं. भारतीय हॉकी टीमला विश्वविजेत्या बेल्जियमने 5-2 ने पराभूत केलं आहे.
मॅच सुरू होताच बेल्जियमने भारतीय हॉकी टीम विरुद्ध पहिला गोल केला. त्यानंतर भारतीय टीमने सुद्धा बेल्जियम विरुद्ध गोल करत बरोबरी केली. यानंतर भारतीय टीमने आणखी एक गोल करत 2-1 ने आघाडी घेतली. मग, बेल्जियमच्या टीमने सुद्धा गोल करत 2-2 ने बरोबरी केली. त्यानंतर पुन्हा बेल्जियमच्या टीमने एका मागे एक असे दोन गोल करत 5-2 ने आघाडी घेतली आणि विजय मिळवला.
#TokyoOlympics: Indian men's hockey team loses to Belgium 5-2 in the semi-final, to play for bronze medal pic.twitter.com/isYlLzRDH1
— ANI (@ANI) August 3, 2021
भारतीय हॉकी टीमचा पराभव झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं, जिंकणे आणि पराभूत होणे हा जीवनाचा एक भाग आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष हॉकी टीमने त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन केले आणि तेच महत्त्वाचे आहे. टीमला पुढील सामन्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा. भारताला आमच्या सर्व खेळाडूंचा अभिमान आहे.
Wins and losses are a part of life. Our Men’s Hockey Team at #Tokyo2020 gave their best and that is what counts. Wishing the Team the very best for the next match and their future endeavours. India is proud of our players.
— Narendra Modi (@narendramodi) August 3, 2021
पंतप्रधान मोदी सुद्धा पाहत होते मॅच
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा भारत विरुद्ध बेल्जियम ही सेमीफायनल मॅच लाईव्ह पाहत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन भारतीय टीमला प्रोत्साहन दिले आणि शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटलं, मला माझ्या टीमचा आणि त्यांच्या कौशल्याचा अभिमान आहे.
I’m watching the India vs Belgium Hockey Men’s Semi Final at #Tokyo2020. Proud of our team and their skills. Wishing them the very best!
— Narendra Modi (@narendramodi) August 3, 2021
भारत विरुद्ध बेल्जियम मॅचेसची आकडेवारी
2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमने भारताचा 3-0ने पराभव केला होता. तर 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमने 3-1 ने पराभूत केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hockey, Olympics 2021