मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics : सिंधू आणि पूजा राणीचा महामुकाबला थोड्याच वेळात, जिंकल्या तर मेडल निश्चित

Tokyo Olympics : सिंधू आणि पूजा राणीचा महामुकाबला थोड्याच वेळात, जिंकल्या तर मेडल निश्चित

Tokyo Olympics 2020 थोड्यावेळामध्येच महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि महिला बॉक्सर पूजा राणी (Pooja Rani) मैदानात उतरणार आहेत. या दोघींनी जर आजचा सामना जिंकला तर भारताच्या खात्यात आणखी दोन मेडल येतील.

  • Published by:  Shreyas

टोकयो, 31 जुलै : भारताला टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) आतापर्यंत दोन मेडल मिळणार हे निश्चित झालं आहे. महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) सिल्व्हर मेडल पटकावलं, तर महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेननेही (Lovlina Borgohain) सेमी फायनलमध्ये पोहोचून मेडल निश्चित केलं आहे. थोड्यावेळामध्येच महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि महिला बॉक्सर पूजा राणी (Pooja Rani) मैदानात उतरणार आहेत. या दोघींनी जर आजचा सामना जिंकला तर भारताच्या खात्यात आणखी दोन मेडल येतील. याआधी 2016 साली रियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने सिल्व्हर मेडल जिंकलं होतं.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आपल्या दुसऱ्या ऑलिम्पिक मेडलपासून फक्त एक पाऊल दूर आहे. क्वार्टर फायनलमध्ये तिने जपानच्या अकाने यामागुचीला हरवलं आणि सेमी फायनल गाठवली. सिंधूचा सामना आता चीनच्या ताइपे की ताई जू यिंग सोबत होणार आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलेल्या सिंधूवर देशाचं लक्ष आहे. यावेळी सिंधू तिच्या मेडलचा रंग बदलेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

यामागुचीविरुद्ध क्वार्टर फायनलमध्ये सिंधूने पहिला गेम सहज जिंकला, पण दुसऱ्या गेममध्ये तिला बराच घाम गाळावा लागला. 56 मिनीटं चाललेल्या या सामन्यात सिंधूने 21-13 आणि 22-20 ने विजय मिळवला.

महिला बॉक्सिंगच्या मिडल वेट कॅटेगरीच्या क्वार्टर फायनलमध्ये पूजा राणीकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. 2021 आशियाई चॅम्पियनशीपमध्ये पूजाने विजय मिळवला होता. पूजासमोर 2016 रियो ऑलिम्पिकची ब्रॉन्झ मेडलिस्ट चीनच्या ली क्यूचं आव्हान आहे.

First published:

Tags: Olympics 2021, P v sindhu