जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये वाद, भारतीय खेळाडूनं कोचचा सल्ला नाकारला!

Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये वाद, भारतीय खेळाडूनं कोचचा सल्ला नाकारला!

Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये वाद, भारतीय खेळाडूनं कोचचा सल्ला नाकारला!

भारताची टेबल टेनिस स्टार मनिका बत्रानं (Manika Batra) मॅचच्या दरम्यान राष्ट्रीय कोच सौम्यदीप रॉय यांचा सल्ला ऐकण्यास नकार दिला. मनिकाच्या या विजयापेक्षाही कोचसोबतचा वाद (Manika Batra Coach Controversy) हा जास्त चर्चेचा विषय ठरला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जुलै: भारताच्या मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकत शनिवारचा दिवस गाजवला. त्याच दिवशी एका वादामुळे भारतीय पथक चर्चेत आले. टेबल टेनिसच्या मॅचच्या दरम्यान हा वाद झाला. भारताची टेबल टेनिस स्टार मनिका बत्रानं (Manika Batra) मॅचच्या दरम्यान राष्ट्रीय कोच सौम्यदीप रॉय यांचा सल्ला ऐकण्यास नकार दिला. जागतिक क्रमवारीत 62 व्या क्रमांकावर असलेल्या मनिकानं ब्रिटनची 94 वी मानांकित टिन टिनला 4-0 असं सहज पराभूत केले. मनिकाच्या या विजयापेक्षाही कोचसोबतचा वाद  (Manika Batra Coach Controversy) हा जास्त चर्चेचा विषय ठरला. काय आहे प्रकरण? मनिकाचे खासगी कोच सन्मय परांजपे यांना बऱ्याच खटपटीनंतर टोकयोमध्ये जाण्याची मंजुरी देण्यात आली. मात्र त्यांना राष्ट्रीय टीमसोबत ऑलिम्पिक नगरीमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली नाही. ते हॉटेलमध्ये उतरले असून त्यांना फक्त सरावाच्या दरम्यान ऑलिम्पिक नगरीमध्ये येण्याची परवानगी देण्यात आली आहे. परांजपे यांना मॅचच्या दरम्यानही उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मानिका बत्रानं केली होती. मानिकाची ही मागणी आयोजकांनी फेटाळली, अशी माहिती भारतीय टेबल टेनिस फेडरेशनचे सल्लागार एम.पी. सिंह यांनी दिली आहे. सिंह यांनी याबाबत पीटीआयला सांगितले की, ‘मानिकाच्या खासगी कोचना कोर्टमध्ये येण्यास मनाई करण्यात आल्यानंतर तिने मॅचच्या दरम्यान राष्ट्रीय कोच सौम्यदीप रॉय यांचा कोणताही सल्ला ऐकण्यास नकार दिला.’ सिल्व्हर गर्ल मीराबाईला मिळणार आयुष्यभर पिझ्झा फ्री! ‘ती’ प्रतिक्रिया ऐकताच कंपनीची घोषणा शरथ कमल आणि मानिका बत्रा यांच्या मिश्र टेबिल टेनिस मॅचच्या दरम्यान रॉय कोर्टवर उपस्थित होते. मात्र मनिकाच्या एकेरीतील लढतीच्या वेळी कोच कॉर्नरवरील खूर्ची रिकामी होती. 2006 साली झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या पुरुषांच्या टीमचे रॉय हे सदस्य होते. त्यांनी दिग्गज टेबल टेनिसपटू शरथ कमलसोबतही टेबल टेनिस खेळले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात