टोकयो, 25 जुलै : वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) सिल्व्हर मेडल जिंकून दिल्यानंतर नव्या जोमानं भारतीय खेळाडू रविवारी ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics 2020) उतरले आहेत. रियो ऑलिम्पिक स्पर्धेत (Rio Olympics) सिल्व्हर मेडलची कमाई करणारी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनं (PV Sindhu) या स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.
सिंधूकडून यंदा देशाला गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. सिंधूनं पहिल्या लढतीमध्ये सुरुवात तरी जोरदार केली आहे. सिंधूनं इस्रायलच्या पोलीकरपोवाचा 21-7, 21-10 असा दोन सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूनं पहिला गेम अवघ्या 13 मिनिटामध्ये जिंकला. पोलीकरपोवानं दुसऱ्या गेममध्ये थोडाफार प्रतिकार करत काही मॅच पॉईंट्स वाचवले. पण, सिंधूच्या धडाक्यापुढे तिचे काही चालले नाही. सिंधूनं दुसरा गेम 21-10 असा जिंकत हा सामना खिशात टाकला.
PV Sindhu is off to a winning start at Tokyo Olympics
She comfortably beats Israeli Ksenia Polikarpova 21-7 21-10 in her opening group game.#Badminton | #Tokyo2020 | #TeamIndia pic.twitter.com/eDBKv0KAx8 — The SportsGram India (@SportsgramIndia) July 25, 2021
रोईंग टीमची सेमी फायनलमध्ये धडक
भारताच्या रोईंग टीममधील अर्जुन लाल (Arjun Lal) आणि अरविंद सिंह (Arvind Singh) या जोडीनं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. रोईंगमधील डबल स्केल रेपचेज राऊंडमध्ये त्यांनी तिसऱ्या क्रमांकासह सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय जोडीनं शेवटच्या टप्प्यात जोरदार खेळ करत सेमी फायनलमध्ये धडक मारली.
#Rowing#Cheer4India #Olympics #TeamIndia Good news.. Reach to Semi-Final Best wishes pic.twitter.com/efd6WLGLfx
— #Cheer4India #Tokyo2020 (@sweet_samrajya) July 25, 2021
शूटींगमध्ये महिलांची निराशा
भारतीय महिलांनी रविवारी शूटींगमध्ये निराशा केली. मनू भाकर (Manu Bhaker) आणि यशस्विनी देसवाल (Yashaswini Deswal) यांचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंट्समध्ये या दोघींकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र त्यांना पात्रता फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले.
अभिनव बिंद्रानं रजत पदक विजेती मीराबाई चानूसाठी लिहिलं भावनिक पत्र; म्हणाला...
मनू भाकरच्या बंदुकीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे स्पर्धेच्या दरम्यान तिचे पाच मिनिटं वाया गेले. त्यानंतरही तिनं प्रयत्न केला. पण ती 600 पैकी 575 पॉईंट्स घेत बाराव्या क्रमांकावर राहिली. यशस्विनीनं 574 पॉईंट्स घेत 13 वा क्रमांक पटकावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021