• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Tokyo Olympics : सिंधू-सायनामध्ये ऑल इज नॉट वेल? मेडल जिंकल्यावर म्हणाली...

Tokyo Olympics : सिंधू-सायनामध्ये ऑल इज नॉट वेल? मेडल जिंकल्यावर म्हणाली...

भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) सोमवारी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ब्रॉन्झ मेडल मिळवलं. या विजयानंतर तिला राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंदने (Pullela Gopichand) शुभेच्छा देणारा मेसेज पाठवला, पण ज्येष्ठ खेळाडू सायना नेहवालने (Saina Nehwal) मात्र तिला शुभेच्छा दिल्या नाहीत.

 • Share this:
  टोकयो, 2 ऑगस्ट : भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) सोमवारी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ब्रॉन्झ मेडल मिळवलं. या विजयानंतर तिला राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंदने (Pullela Gopichand) शुभेच्छा देणारा मेसेज पाठवला, पण ज्येष्ठ खेळाडू सायना नेहवालने (Saina Nehwal) मात्र तिला शुभेच्छा दिल्या नाहीत. माजी वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधू रविवारी दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारी दुसरी भारतीय आणि पहिली महिला खेळाडू ठरली. 2016 साली रियो ऑलिम्पिकमध्ये तिला सिल्व्हर मेडल मिळालं होतं. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पदक जिंकल्यानंतर गोपीचंद आणि सायना नेहवाल यांनी संपर्क केला का? असा प्रश्न सिंधूला विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना सिंधू म्हणाली, 'गोपी सरांनी मला शुभेच्छा दिल्या. मी अजूनपर्यंत सोशल मीडिया बघितलं नाही. हळू-हळू सगळ्यांना उत्तर देत आहे. गोपी सरांनी मेसेज पाठवला, पण सायनाने पाठवला आहे. आम्ही फार बोलत नाही.' मागच्या वर्षी कोरोना महामारीच्या काळात पीव्ही सिंधू तीन महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी लंडनला गेली होती. यानंतर तिच्यात आणि गोपीचंद यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या. भारतात परतल्यानंतर सिंधू गोपीचंद यांच्या अॅकेडमीमध्ये न जाता गचीबाऊली इनडोअर स्टेडियममध्ये सरावासाठी गेली, तसंच तिने तेई-सांग यांचं मार्गदर्शन घेतलं. गोपीचंद यांच्यासोबतच्या वादावर सिंधूने कधीच प्रतिक्रिया दिली नाही. ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने भारताला बॅडमिंटनचं पहिलं मेडल जिंकवून दिलं होतं. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. यानंतर पीव्ही सिंधूने 2016 रियो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर आणि आता टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. लागोपाठ तीन ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमधून मेडल मिळालं आहे. यावेळी सायना नेहवालला ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होता आलं नव्हतं.
  Published by:Shreyas
  First published: