मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics : पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधूसोबत खाणार आईसक्रीम, कारण...

Tokyo Olympics : पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधूसोबत खाणार आईसक्रीम, कारण...

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला आणखी एक पदक मिळालं आहे. मीराबाई चानूनंतर (Mirabai Chanu) बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे. सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) कौतुक केलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

टोकयो, 1 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला आणखी एक पदक मिळालं आहे. मीराबाई चानूनंतर (Mirabai Chanu) बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे. सिंधूने चीनच्या बिंग जियाओचा दोन सरळ सेटमध्ये 21-13, 21-15 ने पराभव केला. पी.व्ही सिंधू लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. पीव्ही सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) कौतुक केलं आहे. 'सिंधूच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आम्ही आनंदी आहोत. टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावल्याबद्दल तिचं अभिनंदन. ती भारताचा अभिमान आहे, तसंच सिंधू भारताच्या सर्वोत्तम ऑलिम्पिक खेळाडूंपैकी एक आहे,' असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिकला रवाना होण्याआधी खेळाडूंशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी पीव्ही सिंधूला तू टोकयोवरून परत आलीस की आपण आईसक्रीम खाऊ, असं सांगितलं होतं. ऑलिम्पिकआधी सिंधूसोबत बोलताना मोदींनी सिंधूला तिच्या आईसक्रीमच्या आवडीबद्दल विचारलं होतं. एवढ्या मोठ्या स्पर्धेआधी आपल्याला आईसक्रीम खाता येत नाही, कारण ऑलिम्पिकची तयारी करताना अशा गोष्टींवर ताबा ठेवावा लागतो, असं सिंधू पंतप्रधानांना म्हणाली होती. सिंधूच्या या वक्तव्यानंतर मोदींनी आपण एकत्र आईसक्रीम खाऊ असं तिला सांगितलं.

पंतप्रधानांसोबत संवाद साधल्यानंतर सिंधूने प्रतिक्रिया दिली होती. 'पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याची संधी मिळणं हा माझा सन्मान आहे. मी त्यांना आणि देशाच्या सगळ्यांना धन्यवाद देते, कारण नेहमीच आम्हाला पाठिंबा मिळत आला आहे. आम्हीही ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करू,' असं सिंधू म्हणाली.

First published:

Tags: Olympics 2021, P v sindhu, Pm narendra mdi