जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / इशांतला मागे टाकलं, रिचर्ड हॅडलींचा विक्रम मोडला, टीम साऊदीचा पराक्रम!

इशांतला मागे टाकलं, रिचर्ड हॅडलींचा विक्रम मोडला, टीम साऊदीचा पराक्रम!

इशांतला मागे टाकलं, रिचर्ड हॅडलींचा विक्रम मोडला, टीम साऊदीचा पराक्रम!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा (England vs New Zealand) फास्ट बॉलर टीम साऊदीने (Tim Southee) धमाकेदार कामगिरी केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 6 जून : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा (England vs New Zealand) फास्ट बॉलर टीम साऊदीने (Tim Southee) धमाकेदार कामगिरी केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये साऊदीने 43 रन देऊन 6 विकेट घेतल्या, ज्यामुळे न्यूझीलंडने इंग्लंडचा 275 रनवर ऑल आऊट केला. या कामगिरीमुळे साऊदीने भारताचा फास्ट बॉलर इशांत शर्मालाही (Ishant Sharma) मागे टाकलं आहे. एवढच नाही तर त्याने महान बॉलर सर रिचर्ड हॅडली (Richard Headley) यांचा विक्रमही मोडला आहे. 30 वर्षांच्या टीम साऊदीची ही 78 वी टेस्ट मॅच आहे. आतापर्यंत त्याने 308 विकेट घेतल्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट घेऊन त्याने इशांत शर्माला मागे टाकलं. इशांतने 101 टेस्टमध्ये 303 विकेट घेतल्या, तर फ्रेड ट्रूमन यांना 67 टेस्टमध्ये 307 विकेट मिळाल्या. रिचर्ड हॅडली यांच्या नावावर टेस्टमध्ये 431 विकेट तर डॅनियल व्हिटोरी (Daniel Vettori) याच्या नावावर 362 विकेट आहेत. हॅडली आणि व्हिटोरी यांच्यानंतर साऊदी हा 300 पेक्षा जास्त विकेट घेणारा न्यूझीलंडचा तिसरा बॉलर आहे. साऊदीने आतापर्यंत 303 आंतरराष्ट्रीय मॅचम्ये 591 विकेट घेतल्या. हॅडली यांनी 201 मॅचमध्ये 589 विकेट मिळवल्या होत्या. न्यूझीलंडकडून डॅनियल व्हिटोरी याने 442 मॅचमध्ये सर्वाधिक 705 विकेट मिळवल्या. भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जूनपासून इंग्लंडच्याच साऊथम्पटनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final)होणार आहे. टीम साऊदी याचा हा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात