मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20WC Semi-final: 2 जागांसाठी 5 संघामध्ये होणार 'काटे की टक्कर' पण Team Indiaचा प्रवास खडतर

T20WC Semi-final: 2 जागांसाठी 5 संघामध्ये होणार 'काटे की टक्कर' पण Team Indiaचा प्रवास खडतर

Team India

Team India

टी-20 वर्ल्ड कपमधील (t20 world cup) सेमीफायनलची लढत रंजक बनली आहे. 4 सामन्यांत 4 विजयानंतर इंग्लंडने (England) उर्वरित संघांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे.

दुबई, 1 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपच्या (ICC T20 World Cup) सुपर-12 स्टेजमध्येमधील सामने आता शेवटच्या फेरीत पोहोचले आहेत. या आठवड्याच्या अखेरीस कोणते संघ सेमीफायनलमध्ये (Semi Final Race) पोहोचले आहेत हे कळणार आहे. बाद फेरी गाठण्यासाठी सर्व संघ पूर्ण ताकद लावतील. म्हणजेच पुढचे 5 दिवस चाहत्यांसाठी खूपच रोमांचक असणार आहेत. आता दोन जागांसाठी 5 संघांमध्ये लढत होणार आहे. दोन सामन्यांमध्ये दारुण पराभवानंतरही टीम इंडियासाठी (Team India) सेमीफायनलचे दरवाजे पूर्णपणे बंद झालेले नाहीत. विराट कोहलीचा संघ अजूनही शर्यतीत आहे.

दोन्ही गटातील प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. म्हणजेच लढत सोपी नाही. ग्रुप ऑफ डेथ म्हणजेच ग्रुप वनमध्ये सेमीफायनलची लढाई रोमांचक होणार आहे. इंग्लंडनं ग्रुप 1 मध्ये विजयाचा चौकार मारताना 8 गुणांसह सेमीफायनलमधील स्थान पक्कं केलं. टी-20 वर्ल्ड कप 2021 मध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा तो पहिला संघ ठरला. सोमवारी झालेल्या लढतीत त्यांनी श्रीलंकेवर 26 धावांनी विजय मिळवला.

इंग्लंडनं ग्रुप 1 मधून उपांत्य फेरीत स्थान पक्के केले असले तरी दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया शर्यतीत आहेत. आफ्रिका 4 गुण व 0.210 नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यांना उर्वरित सामन्यांत बांगलादेश व इंग्लंडचा सामना करायचा आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यातही 4 गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट -0.627असा असल्यानं त्यांना उर्वरित सामन्यांत बांगलादेश व वेस्ट इंडिजवर मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागेल. बांगलादेश व वेस्ट इंडिज दोन्ही संघांना घातक ठरू शकतात.

पाकिस्तानचा संघ ग्रुप 2 मधून सलग 3 सामने जिंकून आधीच सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. अशा परिस्थितीत आता एका जागेसाठी 3 संघांमध्ये लढत होत आहे. हे भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे आहेत. दुसरीकडे, नामिबिया आणि स्कॉटलंडचे संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले आहेत.

भारताचा सेमीफायनलचा प्रवास खडतर

सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या भारताच्या आशा आता इतर संघांच्या हाती आहेत. सर्व प्रथम भारताला उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. यानंतर विराट कोहलीच्या संघाला न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा एक तरी सामना हरण्याची अपेक्षा करावी लागेल. यानंतर, सेमीफायनलपर्यंत पोहोचणारा संघ नेट रन रेटद्वारे निश्चित केला जाईल. पण दोन दमदार पराभवानंतर टीम इंडियाचा निव्वळ रनरेट -1.609 आहे. म्हणजेच आव्हान कठीण आहे.

टी-20 वर्ल्ड कपमधील सेमीफायनलची लढत रंजक बनली आहे. 4 सामन्यांत 4 विजयानंतर इंग्लंडने उर्वरित संघांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. दुसरीकडे, दुसऱ्या गटात पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पण इतर संघांचे भवितव्य पणाला लागले आहे.

First published:

Tags: T20 cricket, T20 world cup