क्रिकेट (Cricket) या क्रीडाप्रकाराला (Sports) प्रदीर्घ इतिहास आहे. नव्या काळात क्रिकेटमध्ये ट्वेंटी-ट्वेंटीसारखे अनेक प्रयोग पाहायला मिळाले. या प्रयोगांना क्रिकेटच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे; पण टेस्ट किंवा कसोटी (Test Match) हा अभिजात क्रिकेटचा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. आजच्या काळात सगळ्याच गोष्टी फास्ट झाल्याने पाच दिवसांच्या टेस्ट मॅचेसच्या चाहत्यांची संख्या कमी आहे. तरीही टेस्ट क्रिकेटची गणना क्लासिक क्रिकेटमध्ये होते. कसोटी सामन्यांचा खास असा चाहतावर्गही आहे. टेस्ट मॅचेसच्या बाबतीत अनेक वेगवेगळ्या विक्रमांची नोंद झालेली आहे. अशीही एक टेस्ट मॅच खेळली गेली होती, की जिच्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात नको त्या रेकॉर्डची नोंद झाली. टेस्ट मॅचेसना 144 वर्षांचा इतिहास आहे. नियमानुसार, टेस्ट क्रिकेटमध्ये प्रत्येक टीमला 2-2 डाव खेळण्याची संधी मिळते. तसंच टेस्ट क्रिकेटमध्ये गोलंदाजीला कोणतीही मर्यादा नसते. जो संघ 20 विकेट्स मिळवतो, तोच टेस्ट मॅचमध्ये विजयी ठरतो. पूर्वीच्या काळी टेस्ट मॅच 6 दिवसांपर्यंत चालत असे. कारण या सहापैकी एक दिवस विश्रांतीसाठी (Rest Day) राखीव असे; मात्र आता टेस्ट मॅच 5 दिवसांची असते. हे ही वाचा- विजयाचा मंत्र! टीम इंडियाला करावं लागेल हे छोटसं काम केवळ 10 बॉल्सची टेस्ट मॅच एक टेस्ट मॅच अशी खेळली गेली होती, की जी केवळ 10 बॉल्समध्येच संपुष्टात आली. 2009मध्ये इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडिज (West indies) या संघांदरम्यान नॉर्थ साउंड स्टेडिअममध्ये ही टेस्ट मॅच खेळली गेली. या मॅचमध्ये वेस्ट इंडिज टीमने टॉस जिंकला आणि इंग्लंडच्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी (Batting) आमंत्रित केलं. या मॅचमध्ये इंग्लंडच्या टीमने आपल्या डावातले केवळ 10 बॉल्स खेळले असता, वेस्ट इंडिज टीमच्या खेळाडूंना बॉलिंग (Bowling) करण्यात अडचणी येत असल्याचं दिसून आलं. बॉलर्सचे स्टेडियमवर रुतत होते पाय ‘स्पोर्ट्झविकी’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘रन अप’वेळी बॉलर्सचे पाय वालुकामय मातीत रुतत होते. त्यामुळे बॉलर्सना गोलंदाजी करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अडचण लक्षात येताच वेस्ट इंडिजच्या बॉलर्सनी याबाबत अंपायरकडे तक्रार केली. त्यानंतर मॅच रेफरी अॅलन हर्स्ट मैदानावर आले. बॉलर्सना बॉलिंग करताना येत असलेल्या अडचणी बघता, दोन्ही संघांचे कॅप्टन, अंपायर आणि मॅच रेफरींनी आपापसांत चर्चा करुन मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला. कारण अशा मैदानावर बॉलिंग करणं बॉलर्ससाठी जोखमीचं ठरू शकणार होतं. या टेस्ट मॅचमुळे आपल्या बॉलर्सना दुखापत होऊ नये, यावर दोन्ही टीम्सच्या कॅप्टनचं एकमत झालं. या सर्व घडामोडींमुळे ही टेस्ट मॅच केवळ 10 बॉल्समध्येच संपली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.