मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /तुझी वाट लागो! पाकिस्तानचा शोएब अख्तर भारतीय क्रिकेटर जहीर खानबद्दल असं का म्हणाला?

तुझी वाट लागो! पाकिस्तानचा शोएब अख्तर भारतीय क्रिकेटर जहीर खानबद्दल असं का म्हणाला?

तुझी वाट लोगो! पाकिस्तानचा शोएब अख्तर भारतीय क्रिकेटर जहीर खानबद्दल असं का म्हणाला?

तुझी वाट लोगो! पाकिस्तानचा शोएब अख्तर भारतीय क्रिकेटर जहीर खानबद्दल असं का म्हणाला?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर याने वीरेंद्र सेहवाग सोबत केलेल्या मुलाखतीत भारताचा क्रिकेटर जहीर खान विषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाजा म्ह्णून केली होती. असे असताना सेहवाग मधल्या फळीतून सलामीवीर कसा बनला? हा प्रश्न अनेक क्रिकेटप्रेमींच्या मनात डोकावतो. अशातच सेहवागने पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरच्या शो वर त्याला टॉप ऑर्डरमध्ये बढती देण्याची कल्पना कोणाची होती, याबद्दल खुलासा केला.

सेहवागने याविषयी बोलताना सांगितले की, मी त्याला टॉप ऑर्डरमध्ये खेळण्याची संधी मिळाली यामागे भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याचे सर्वात महत्त्वाचे योगदान होते. ज्याने तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीला मला पुढे खेळायला देण्याची शिफारस केली होती.

हे ही वाचा  : मोहम्मद शमीकडून लाखोंची पोटगी, पूर्व पत्नी जगतेय आलिशान आयुष्य, Photos Viral

वीरेंद्र सेहवागने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत जगातील कोणत्याही गोलंदाजाला सोडले नाही. सेहवाग फलंदाजी करत असताना नेहमी निर्भयपणे गोलंदाजीला सामोरे जायचा. पहिल्या चेंडूपासून फटके मारण्याची सवय सेहेवागला होती. सेहवागने 1999 साली मोहालीमध्ये पाकिस्तानविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या सामन्यात सेहवाग सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर शोएब अख्तरने वीरूला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.  परंतु यानंतर सेहवाग टॉप ऑर्डर मध्ये खेळायला आल्यानंतर त्याने शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर अनेकदा मोठी खेळी केली.

शोएब अख्तरने त्याच्या शोमध्ये सेहेवागला विचारले की, तुला टॉप ऑर्डरमध्ये खेळायला घेण्याची  कल्पना कोणाची होती? यावर सेहवाग म्हणाला की, मी टॉप ऑर्डरमध्ये खेळावे ही जहीर खानची कल्पना होती. त्यानेच सौरव गांगुलीला हे सांगितले आणि दादाने मला टॉप ऑर्डरमध्ये खेळण्याची संधी दिली. सेहवागचे हे वक्तव्य ऐकून अख्तर विनोदी स्वरात म्हणाला, 'जहीर खान, तुझी वाट लागो, तू आमच्यासोबत हे काय केलेस.'

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, Shoaib akhtar, Zaheer Khan