रांची, 8 ऑक्टोबर: भारतीय संघ रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. पण दीपक चहर घोट्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानं धवनसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. लखनौतील पहिल्या वनडेपूर्वी चहरला दुखापत झाली होती आणि आता पाठीचा त्रासही त्याला सतावत आहे. मोहम्मद सिराज आणि आवेश खानची गोलंदाजी त्या सामन्यात निष्प्रभ ठरली होती. नवीन बॉलवर विकेट काढणं या दोन्ही बॉलर्सना जमलं नाही. अशा परिस्थितीत रांची वन डेत शिखर धवन संघात बदल करण्याची शक्यता आहे. त्या संघात एका युवा गोलंदाजाला पदार्पणाची संधी मिळू शकते.
बंगालचा मुकेश कुमार अंतिम अकरात?
रांची वन डेत बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला संधी दिली जाऊ शकते. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये गेल्या काही सामन्यात मुकेश कुमारनं दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे सिराज किंवा आवेश खानऐवजी त्याला अंतिम अकरात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. लखनौच्या पहिल्या वन डेत ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोईनं भारतीय वन डे संघात पदार्पण केलं होतं.
हेही वाचा - T20 World Cup: रोहित अँड कंपनीसाठी पुढचे 8 दिवस खास, कसं सुरु आहे टीम इंडियाचं प्रॅक्टिस सेशन? Video
संजू सॅमसनचा भन्नाट फॉर्म
टीम इंडियानं लखनौ वन डे गमावली असली तरी त्या सामन्यातली सकारात्मक बाब म्हणजे संजू सॅमसनची इनिंग. संजू सॅमसन सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. वर्ल्ड कप संघात जागा मिळाली नसली तरी संजूनं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कामगिरीत सातत्य राखलं होतं. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघानं नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या वन डे मालिकेत विजेतेपद पटकावलं होतं. तोच संजू सॅमसन लखनौच्या पहिल्या वन डेतही चमकला. त्यानं 86 धावांनी नाबाद खेळी करुन भारताला विजयाच्या अगदी जवळ आणून ठेवलं होतं. पण त्याचे प्रयत्न 9 धावांनी अपुरे पडले.
Touchdown Ranchi 📍#TeamIndia | #INDvSA pic.twitter.com/HCgIQ9pk0M
— BCCI (@BCCI) October 8, 2022
चहर आऊट, वॉशिंग्टन सुंदरला संधी
दरम्यान वर्ल्ड कप संघात स्टँड बाय खेळाडूंच्या यादीत असलेला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर उर्वरित दोन्ही वन डे सामन्यांनाही मुकणार आहे. चहरच्या पायाला दुखापत झाल्यानं तो वन डे मालिकेत खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे. त्याच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करण्यात आला आहे.
🚨 NEWS 🚨: Washington Sundar replaces Deepak Chahar in ODI squad. #TeamIndia | #INDvSA More Details 🔽https://t.co/uBidugMgK4
— BCCI (@BCCI) October 8, 2022
भारत वि. दक्षिण आफ्रिका, दुसरी वन डे
झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, रांची
9 ऑक्टोबर, दुपारी 1.30 वाजता
स्टार स्पोर्ट आणि डिस्ने हॉट स्टारवर थेट प्रक्षेपण
भारत संभाव्य प्लेईंग इलेव्हन- शिखर धवन (कॅप्टन), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, संजू सॅमसन (विकेट किपर), मोहम्मद सिराज, आवेश खान/मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Shikhar dhavan, Sports