जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियाच्या खेळाडूंना कधी मिळणार कोरोनाची दुसरी लस? जाणून घ्या

टीम इंडियाच्या खेळाडूंना कधी मिळणार कोरोनाची दुसरी लस? जाणून घ्या

टीम इंडियाच्या खेळाडूंना कधी मिळणार कोरोनाची दुसरी लस? जाणून घ्या

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम (Team India) 2 जूनला मुंबईवरून रवाना होईल. या दौऱ्यात पहिले भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होईल, यानंतर भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 मे : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम (Team India) 2 जूनला मुंबईवरून रवाना होईल. या दौऱ्यात पहिले भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होईल, यानंतर भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होईल. जवळपास 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ भारतीय टीम इंग्लंडमध्ये राहणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी बहुतेक भारतीय खेळाडूंनी कोरोनाचा पहिला डोस (Corona Vaccine) घेतला आहे. यानंतर आता त्यांना दुसरी लस इंग्लंडमध्ये दिली जाणार आहे. इंग्लंडच्या आरोग्य विभागाच्या निगराणीमध्ये ही लस दिली जाईल. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडियाला लसीचा दुसरा डोस देण्याची जबाबदारी युकेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयनेही (BCCI) तयारी सुरू केली आहे, यासाठी काही खेळाडू आज मुंबईत दाखल होणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी खेळाडूंना 24 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. यातले 14 दिवस मुंबईत तर 10 दिवस इंग्लंडमधले असतील. भारतीय खेळाडूंना मुंबईत बायो-बबलमध्ये प्रवेश करण्याआधी आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह येणं बंधनकारक आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाणारे ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) कोरोनामुक्त झाले आहेत, त्यामुळे हे दोघं आता इंग्लंडला जाऊ शकतात. साहाला बीसीसीआयने कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आणि काही दिवसांनी बायो-बबलमध्ये यायची परवानगी दिली आहे. दुसरीकडे अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाल्यानंतर केएल राहुलही (KL Rahul) फिट झाला आहे, त्यामुळे तोदेखील इंग्लंडला जाणार आहे. आयपीएल 2021 दरम्यान राहुलच्या पोटात दुखत होतं, यानंतर स्कॅनिंग केलं असता त्याला अपेंडिक्सचा त्रास असल्याचं समोर आलं, त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे राहुलला आयपीएल अर्ध्यातच सोडावी लागली. कोरोना व्हायरसमुळे यावेळची आयपीएल 29 सामन्यांनंतर स्थगित करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात