मुंबई, 7 जून : एकीकडे भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर (India vs England) असतानाच दुसरी टीम इंडिया श्रीलंकेमध्ये (India vs Sri Lanka) जाऊन वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयकडून (BCCI) या दौऱ्याच्या तारखांची घोषणा करण्यात आली नसली तरी या स्पर्धेचे अधिकृत प्रसारणकर्ते असलेल्या टेन स्पोर्ट्सने वेळापत्रकाची घोषणा केली आहे. सोनी टेन स्पोर्ट्सने केलेल्या ट्वीटनुसार 13 जुलैपासून या सीरिजला सुरुवात होईल, तर शेवटची मॅच 25 जुलैला खेळवली जाईल.
टेन स्पोर्ट्सने सोशल मीडियावर या दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक टाकलं आहे. त्यानुसार वनडे सीरिजपासून दौऱ्याला सुरुवात होईल. वनडे मॅच 13 जुलै, 16 जुलै आणि 18 जुलैला होतील. तर टी-20 स्पर्धा 21 जुलै, 23 जुलै आणि 25 जुलैला खेळवण्यात येतील. कोरोना व्हायरसमुळे सीरिजचे सगळे सामने एकाच स्टेडियममध्ये होणार असल्याचं सांगितलं जातंय. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये वनडे आणि टी-20 सीरिज होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Indian waves will crash against the Sri Lankan shore with #JeetneKiZid 🌊 🇮🇳 tour of 🇱🇰, #SirfSonyPeDikhega!
🗓️ Starting 13th July 📺 Sony TEN 1, Sony TEN 3, Sony TEN 4, Sony SIX#SLvIND #INDvSL #SonySports #Cricket pic.twitter.com/P3ZeGTjDXl — Sony Sports (@SonySportsIndia) June 7, 2021
श्रीलंका सीरिजदरम्यान बहुतेक वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये असतील, त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी मिळेल. शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात येईल, असा अंदाज आहे. तसंच दुखापतीमुळे श्रेयस अय्यरच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल आणि नितीश राणा या खेळाडूंनाही श्रीलंका सीरिजसाठी निवडलं जाऊ शकतं. यावर्षी टी-20 वर्ल्ड कप होणार असल्यामुळे नव्या खेळाडूंनाही स्वत:चा खेळ दाखवण्याची संधी मिळणार आहे.
श्रीलंकेच्या टीमचं घरच्या मैदानातलं रेकॉर्ड चांगलं आहे. दोन्ही टीममध्ये श्रीलंकेत आतापर्यंत 61 सामने झाले आहेत. यातल्या भारताने 28 तर श्रीलंकेने 7 मॅच जिंकल्या आहेत. टी-20 मध्ये मात्र टीम इंडियाचा दबदबा राहिला. श्रीलंकेत झालेल्या 5 टी-20 पैकी 4 सामने भारताने जिंकले आहेत, तर श्रीलंकेला फक्त एक विजय मिळवता आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकेची कामगिरी ढासळली आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये श्रीलंकेचा 2-1 ने पराभव झाला आहे. तसंच खेळाडू आणि बोर्ड यांच्यातही करारावरून वाद सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India Vs Sri lanka, Team india