हरारे, 17 ऑगस्ट**:** भारत आणि झिम्बाब्वे संघांमधल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिली वन डे हरारे स्पोर्टस क्लबच्या मैदानावर खेळवली जाणार आहे. त्याआधी लोकेश राहुलच्या फौजेनं जय्यत तयारी केली आहे. गेले तीन दिवस हरारेत भारतीय संघाचा कसून सराव सुरु होता. बीसीसीआयनं सरावाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.
Preps ✅
— BCCI (@BCCI) August 17, 2022
Smiles 🔛
One day away from the first #ZIMvIND ODI! 👍 👍#TeamIndia pic.twitter.com/iIN1poVC6N
राहुल सहा महिन्यांनी मैदानात या वन डेच्या निमित्तानं टीम इंडियाचा कर्णधार लोकेश राहुल तब्बल सहा महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात राहुल भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. पण त्यानंतर दुखापतीमुळे त्याला इंग्लंड, आयर्लंड आणि विंडीज दौऱ्याला मुकावं लागलं होतं. पण झिम्बाब्वे दौऱ्य़ाआधी राहुल फिट झाला. त्यामुळे निवड समितीनं आशिया चषकाआधी तयारीसाठी राहुलला झिम्बाब्वेतील वन डे मालिकेसाठीच्या भारतीय संघात स्थान दिलं. आणि कर्णधारपदही त्याच्याकडे सोपवलं. झिम्बाब्वेला कमी लेखणार नाही- धवन काल झालेल्या पत्रकार परिषदेत उपकर्णधार शिखर धवननं झिम्बाब्वेचं आव्हान सोपं नसल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही सामन्यात झिम्बाब्वेनं दमदार कामगिरी बजावली आहे. त्यामुळे या संघाला कमी लेखणार नसल्याचं धवननं म्हटलंय. या मालिकेआधी झिम्बाब्वेनं बांगलादेशला वन डे आणि टी20त 2-1 अशा फरकानं हरवलं आहे. “झिम्बाब्वे सध्या चांगलं क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे आमच्यासाठीही ही बाब चांगली आहे.’’ असंही धवननं म्हटलंय. सुंदर ‘आऊट’****, शाहबाज इन दरम्यान वॉशिंग्टन सुंदरला दुखापतीमुळे मालिकेच्या सुरुवातीआधीच संघाबाहेर जावं लागलं आहे. सुंदरच्या जागी बंगालच्या शाहबाज अहमदचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. हेही वाचा - Asia Cup: आशिया चषकाआधी विराट करतोय जोरदार तयारी… वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर भारत-झिम्बाब्वे वन डे मालिका 18 ऑगस्ट – पहिली वन डे, हरारे स्पोर्टस क्लब 20 ऑगस्ट – दुसरी वन डे, हरारे स्पोर्टस क्लब 22 ऑगस्ट – तिसरी वन डे, हरारे स्पोर्टस क्लब मालिकेतले तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वा. सुरु होतील भारतीय संघ – लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर