जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / रविंद्र जडेजा T20 World Cup मधून बाहेर? कोचकडून मोठा खुलासा पाहा VIDEO

रविंद्र जडेजा T20 World Cup मधून बाहेर? कोचकडून मोठा खुलासा पाहा VIDEO

रविंद्र जडेजा T20 World Cup मधून बाहेर? कोचकडून मोठा खुलासा पाहा VIDEO

रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे टी-20 आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडला. ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये ऑस्‍ट्रेलियामध्‍ये होणार्‍या टी-20 वर्ल्ड कपमध्येही खेळण्यावरही प्रश्नचिन्हं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे टी-20 आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडला. ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये ऑस्‍ट्रेलियामध्‍ये होणार्‍या टी-20 वर्ल्ड कपमध्येही खेळण्यावरही प्रश्नचिन्हं आहे. जडेजा टी २० वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही यावर कोच राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कोच राहुल द्रविडने जडेजाच्या दुखापतीबद्दल मोठे अपडेट दिले आणि सांगितले की कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे आताच चुकीच होईल. सध्या यूएईमध्ये आशिया कपचे सामने सुरू आहेत. जडेजाने पाकिस्तानविरुद्ध शानदार 35 धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर हाँगकाँगविरुद्ध दुसऱ्या डावात त्याने बॉलिंगने कमाल केली. हेही वाचा-Asia Cup 2022: श्रीलंकेनं रोखला अफगाणिस्तानचा विजयरथ, पहिल्याच सुपर-4 सामन्यात 4 विकेट्सनी विजय टी २० वर्ल्ड कप अजून लांब आहे. त्या अनुषंकाने सध्या तो आपली काळजी घेत आहे. सध्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं चुकीचं ठरेल. त्यामुळे थोडा वेळ जावा लागेल. पुढे काय होते ते आपण पाहू. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जडेजा संघाला चांगले संतुलन देतो, अशी माहिती आहे. यामुळे तो संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे.

जाहिरात

हेहीवाचा-Asia Cup 2022: दुसऱ्या महामुकाबल्यासाठी टीम इंडिया सज्ज, पाहा कशी असेल भारताची प्लेईंग XI? दुखापत हा खेळाचा एक भाग आहे. परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेऊ असंही कोच के एल राहुल म्हणाले आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांनाही दुखापत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे ते आशिया कप खेळत नाहीत. बुमराहची दुखापत अधिक गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात