जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup: पर्थमध्ये सुरु होता वॉर्नरचा 'शो'... मॅच पाहायला पोहोचले टीम इंडियाचे स्टार, Photo

T20 World Cup: पर्थमध्ये सुरु होता वॉर्नरचा 'शो'... मॅच पाहायला पोहोचले टीम इंडियाचे स्टार, Photo

इंग्लंड ऑस्ट्रेलिया सामना पाहायला पोहोचले भारतीय खेळाडू

इंग्लंड ऑस्ट्रेलिया सामना पाहायला पोहोचले भारतीय खेळाडू

T20 World Cup: भारतीय खेळाडू सराव करत असलेलं वाका स्टेडियम पर्थ स्टेडियमपासून जवळच आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या या स्टार्सनी पर्थ स्टेडियममध्ये सामन्याचा आनंद लुटला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पर्थ, 9 ऑक्टोबर: ‘मिशन टी20 वर्ल्ड कप’साठी टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. भारतीय संघाचा पर्थमधल्या वाका स्टेडियमवर सरावही सुरु आहे. दुसरीकडे पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात टी20 मालिकाही सुरु आहे. याच मालिकेतील पहिलासामना आज पर्थ स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या बॅट्समनक़डून धावांचा पाऊस पडला. इंग्लंडनं हा सामना 8 रन्सनी जिंकला. पण या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरची विस्फोटक खेळी पाहायला मिळाली. पर्थ स्टेडियमवर वॉर्नरचा शो सुरु असताना तो पाहायला भारतीय खेळाडूंनीही स्टेडियममध्ये उपस्थिती लावली होती. भारतीय खेळाडू सराव करत असलेलं वाका स्टेडियम पर्थ स्टेडियमपासून जवळच आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या या स्टार्सनी पर्थ स्टेडियममध्ये सामन्याचा आनंद लुटला. पर्थमध्ये ‘वॉर्नर शो’ पर्थच्या टी20त इंग्लंडच्या जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्सनं आधी ऑस्ट्रेलियाची बॉलिंग फोडून काढली. बटलरनं दुखापतीनंतर दमदार कमबॅक करताना 32 बॉल्समध्ये 68 धावा ठोकल्या. तर हेल्सनं 84 धावा फटकावल्या. त्यामुळे इंग्लंडनं 20 ओव्हरमध्ये 208 धावा स्कोअर बोर्डवर लावल्या. पण 209 धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरनं मात्र दमदार सुरुवात केली.

जाहिरात

त्यानंही इंग्लिश आक्रमणाचा समाचार घेतला. त्यानं मैदानात चौफेर फटकेबाजी सुरु ठेवली होती.  त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या सामन्यात विजयाची संधी निर्माण झाली होती. पण 17 व्या ओव्हरमध्ये वॉर्नर आऊट झाला आणि ऑस्ट्रेलियानं सामना अवघ्या 8 रन्सनी गमावला. पण वॉर्नरच्या खेळीची चांगलीच चर्चा झाली. वॉर्नरनं 44 बॉल्समध्ये 8 फोर आणि 2 सिक्ससह 73 धावांची खेळी केली.

हेही वाचा -  Ind vs SA ODI: आणखी एक इंजिनियर टीम इंडियात… हरियाणा ते टीम इंडिया व्हाया बंगाल असा आहे प्रवास अश्विन, चहल, कार्तिक स्टेडियममध्ये दरम्यान हा सामना पाहण्यासाठी टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक, लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल  यांनी स्टेडियममध्ये उपस्थिती लावली होती.

News18

या चौघांचा एक फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात