• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • सूर्या-पृथ्वी नाही, तर हा मुंबईकर घेणार रहाणेची जागा, विराटला म्हणाला 'मी तयार'

सूर्या-पृथ्वी नाही, तर हा मुंबईकर घेणार रहाणेची जागा, विराटला म्हणाला 'मी तयार'

अजिंक्यची जागा घ्यायला हा मुंबईकर खेळाडू तयार

अजिंक्यची जागा घ्यायला हा मुंबईकर खेळाडू तयार

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या (India vs England) मिडल ऑर्डरला संघर्ष (Team India Middle Order) करावा लागला आहे. लीड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा 78 रनवर ऑल आऊट झाला, तर दुसऱ्या इनिंगमध्ये भारताच्या शेवटच्या 8 विकेट फक्त 63 रनवर गेल्या.

 • Share this:
  मुंबई, 29 ऑगस्ट : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या (India vs England) मिडल ऑर्डरला संघर्ष करावा लागला आहे. लीड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा 78 रनवर ऑल आऊट झाला, तर दुसऱ्या इनिंगमध्ये भारताच्या शेवटच्या 8 विकेट फक्त 63 रनवर गेल्या. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या सीरिजमध्ये अपयशी ठरत आहेत. विराट कोहलीने (Virat Kohli) सीरिजच्या 5 इनिंगमध्ये 24.80 च्या सरासरीने 124 रन केले. तर अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) 5 इनिंगमध्ये 19 च्या सरासरीने 95 रन करता आल्या. चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) 32.40 च्या सरासरीने 162 रन केले. टीम इंडियाची बॅटिंग अपयशी ठरत असतानाच मुंबईचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आपण टेस्ट खेळण्यासाठी तयार आहोत, असं म्हणाला आहे. इंग्लंडविरुद्ध यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या सीरिजवेळी अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. इंडिया टुडेशी बोलताना श्रेयस अय्यरने आपलं टेस्ट क्रिकेट खेळण्याचं स्वप्न आहे, असं सांगितलं. श्रेयस अय्यरने 2017 साली मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण 2019 वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये त्याची निवड झाली नाही. आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरला दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व देण्यात आलं, यानंतर मागच्या मोसमात दिल्लीची टीम फायनलमध्ये पोहोचली. खांद्याच्या दुखापतीमुळे अय्यरला यावर्षीच्या आयपीएलच्या पहिल्या राऊंडमध्ये खेळता आलं नाही. आता 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडसाठी अय्यर तयारी करत आहे. 'जेव्हा मी भारतीय क्रिकेट टीमचं इन्स्टाग्राम पेज ओपन करतो आणि टेस्ट टीमचे फोटो बघतो तेव्हा मला या टीममध्ये स्थान मिळवावं, असं वाटतं. माझ्या क्रिकेटचा प्रवास लाल बॉलने सुरू झाला. माझं रणजी ट्रॉफी करियरही चांगलं आहे. मी टेस्ट टीमचा भाग बनू शकतो, असं मला वाटतं,' असं श्रेयस अय्यर म्हणाला. 'तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळावं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. लवकरच हे स्वप्न पूर्ण होईल. मी याबाबत सकारात्मक आहे,' अशी प्रतिक्रिया अय्यरने दिली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधूनच अय्यरने त्याची ओळख बनवली, यानंतर त्याने भारत ए टीमचं प्रतिनिधीत्वही केलं. टेस्ट क्रिकेट तुम्हाला मानसिक आणि शारिरिक आव्हान देतं. 5 दिवस खेळणं सोपं नाही, पण मी याआधी असं केलं आहे. रणजी ट्रॉफीमध्ये मी लागोपाठ मॅच खेळल्या आहेत, असं वक्तव्य अय्यरने केलं.
  Published by:Shreyas
  First published: