मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs WI: टीम इंडियानं टाकला सुटकेचा निश्वास... पाहा, नक्की काय घडलं?

IND vs WI: टीम इंडियानं टाकला सुटकेचा निश्वास... पाहा, नक्की काय घडलं?

टीम इंडियानं टाकला सुटकेचा निश्वास... पाहा, नक्की काय घडलं?

टीम इंडियानं टाकला सुटकेचा निश्वास... पाहा, नक्की काय घडलं?

IND vs WI: वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि गयाना सरकारच्या पुढाकारानं व्हिसा प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यात आल्या असून भारतीय संघाचा फ्लोरिडात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आज भारतीय संघ फ्लोरिडात दाखल होईल.

फ्लोरिडा, 04 ऑगस्ट :  भारत आणि वेस्ट इंडिज संघात पाच सामन्यांची ट्वेन्टी ट्वेन्टी मालिका सध्या सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने त्रिनिदाद आणि सेंट किट्समध्ये पार पडले. आणि अखेरच्या दोन सामन्यांचं आयोजन अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये करण्यात आलं आहे. 6 आणि 7 ऑगस्टला हे सामने पार पडणार आहेत. पण फ्लोरिडात होणाऱ्या दोन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांवर अनिश्चिततेचं सावट पसरलं होतं. आणि याचं कारण ठरलं भारतीय संघाला न मिळालेला अमेरिकन व्हिसा. त्यामुळे अखेरच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ वेळेत पोहोचणार की नाही असा प्रश्न होता. पण वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि गयाना सरकारच्या पुढाकारानं व्हिसा प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यात आल्या असून भारतीय संघाचा फ्लोरिडात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आज भारतीय संघ फ्लोरिडात दाखल होईल.

14 सदस्यांना मिळाला नव्हता व्हिसा

भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मिळून 14 जणांना अमेरिकेचा व्हिसा मिळाला नव्हता. यावेळी तिसऱ्या सामन्यानंतर भारतीय संघातील काही सदस्य गयानातील जॉर्ज टाऊनमध्ये असलेल्या अमेरिकन दूतावासात पोहोचले. यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही उपस्थित होते.

पण रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक, रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव या भारतीय खेळाडूंना फ्लोरिडाला जाण्याची परवानगी आधीच मिळाली होती. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट संघासह हे भारतीय खेळाडूही फ्लोरिडामध्ये पोहोचले आहेत.

हेही वाचा - सूर्यकुमार यादवनं स्वत:लाच दिलं आलिशान गिफ्ट, किंमत कोटींच्या घरात

गयाना सरकारची महत्वाची भूमिका

टीम इंडियाचे उर्वरित सदस्य लवकरच फ्लोरिडात पोहोचतील. पण या सगळ्या घडामोडींदरम्यान गयाना सरकारनं मोलाचं सहकार्य केलं. या प्रकरणात गयाना सरकारनं जातीनिशी लक्ष घालत खेळाडूंच्या व्हिसासंबंधीच्या त्रुटी दूर केल्या आणि ही समस्या सोडवली. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांनी गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांचे आभार मानले.

मालिकेत भारत आघाडीवर

दरम्यान आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने जिंकून मालिकेत वर्चस्व गाजवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील.

First published:

Tags: Cricket, Cricket news, T20 cricket