मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /World Cup च्या टीम सिलेक्शनवरून टीका, निवड समिती सदस्याचं रवी शास्त्रींना प्रत्युत्तर

World Cup च्या टीम सिलेक्शनवरून टीका, निवड समिती सदस्याचं रवी शास्त्रींना प्रत्युत्तर

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी वर्ल्ड कप 2019 साठी (World Cup 2019) केलेल्या टीम निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. रवी शास्त्रींच्या या वक्तव्यावर टीम इंडियाच्या निवड समितीचे माजी सदस्य सरनदीप सिंग (Sarandeep Singh) यांनी भाष्य केलं आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 15 डिसेंबर : टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी वर्ल्ड कप 2019 साठी (World Cup 2019) केलेल्या टीम निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. वनडे वर्ल्ड कपमध्ये एमएस धोनी (MS Dhoni), दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) या तीन विकेट कीपरना निवडण्यात काय लॉजिक होतं माहिती नाही, तसंच अंबाती रायुडूला (Ambati Rayudu) अखेरच्या क्षणी डच्चू देण्यात आपली काहीच भूमिका नव्हती, असं शास्त्री म्हणाले होते. टीम निवड करताना मला किंवा कर्णधाराला कोणतंही मत देता येत नसल्याचंही शास्त्रींनी सांगितलं होतं. रवी शास्त्रींच्या या वक्तव्यावर टीम इंडियाच्या निवड समितीचे माजी सदस्य सरनदीप सिंग (Sarandeep Singh) यांनी भाष्य केलं आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालच्या निवड समितीमध्ये सरनदीप सदस्य होते, याच समितीने 2019 वर्ल्ड कपसाठीची टीम निवडली होती.

'टीम निवड करताना कोच काहीही बोलू शकत नाही, हे शास्त्रींचं म्हणणं योग्य आहे, पण निवड समितीचे सदस्य मैदानात जातात, कर्णधार आणि कोचशी बोलतात. दोघांनाही निवड समितीच्या योजना सांगितल्या जातात, तसंच कॅप्टन आणि कोचला काय हवं आहे, तेदेखील विचारलं जातं. मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही जवळपास सगळ्याच सीरिज जिंकलो आहे,' असं सरनदीप सिंग एएनआयशी बोलताना म्हणाले.

'रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक होते, त्यामुळे कोणता खेळाडू हवा आहे याबाबत ते सांगू शकत होते. तसंच ते विराटकडेही खेळाडूची मागणी करू शकत होते. काहीवेळा आम्ही वेगळा विचार करतो, पण अखेर सगळे एकाच पानावर असतात. चार वर्ष आमच्यात आणि रवी शास्त्री यांच्यात मतभेद झाले नाहीत. ते चांगले प्रशिक्षक होते. प्रत्येकवेळी त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं,' अशी प्रतिक्रिया सरनदीप सिंग यांनी दिली.

सरनदीप सिंग यांनी शिखर धवनला दुखापत झाल्यानंतर ऋषभ पंतची निवड का करण्यात आली, यावरही स्पष्टीकरण दिलं. 'तिन्ही विकेट कीपर चांगले बॅटर होते. धवनला दुखापत झाली तेव्हा पंतची निवड करण्यात आली. केएल राहुल आधीच ओपनर म्हणून टीममध्ये होता, त्यामुळे मधल्या फळीत खेळणारा आणि मोठे शॉट मारणाऱ्या खेळाडूची निवड करणं गरजेचं होतं, त्यामुळे पंतची निवड करण्यात आली. प्लेयिंग इलेव्हन निवडण्याची जबाबदारी मात्र टीम मॅनेजमेंटची असते, यामध्ये निवड समिती दखल देऊ शकत नाही,' असं सरनदीप म्हणाले.

'2019 वर्ल्ड कपमध्ये ऋषभ पंत पहिल्या पसंतीचा खेळाडू नव्हता. धोनी आणि दिनेश कार्तिक टीममध्ये होते, तसंच टीम सगळ्या मॅच जिंकत होती. पॉईंट्स टेबलमध्येही टीम टॉपवर होती. निवड समिती सदस्य युवा खेळाडूंची प्रतिभा पाहण्यासाठी स्थानिक मॅच पाहायला जातात,' असं सरनदीप यांनी सांगितलं.

'अचानक अशा गोष्टी समोर आल्यामुळे नाराज व्हायला होतं, कारण आम्ही आमचं काम योग्य केलं. स्थानिक मॅच पाहण्यासाठी आम्ही खूप प्रवास केला. निवड समितीच्या बैठकीत कर्णधारही नेहमी बसायचा,' असं वक्तव्य सरनदीप सिंग यांनी केलं.

First published:
top videos

    Tags: Ravi shastri, Team india