मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup नंतर राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा कोच? विराटची पहिली प्रतिक्रिया

T20 World Cup नंतर राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा कोच? विराटची पहिली प्रतिक्रिया

टी-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) टीम इंडियाचे प्रशिक्षक राहणार नाहीत. शास्त्रींऐवजी राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा कोच होईल, असं वृत्त आहे.

टी-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) टीम इंडियाचे प्रशिक्षक राहणार नाहीत. शास्त्रींऐवजी राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा कोच होईल, असं वृत्त आहे.

टी-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) टीम इंडियाचे प्रशिक्षक राहणार नाहीत. शास्त्रींऐवजी राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा कोच होईल, असं वृत्त आहे.

दुबई, 16 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) संपल्यानंतर आता टीम इंडियाने (Team India) टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) तयारीला सुरुवात केली आहे. 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार असली तरी भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) आहे. याआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) एमएस धोनीबाबत (MS Dhoni) प्रतिक्रिया दिली आहे. एमएस धोनी टीम इंडियासोबत मेंटर असल्यामुळे आमचं मनोबल वाढेल. तो टीममध्ये आल्यामुळे आम्ही खूश आहोत, असं विराट म्हणाला. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2007 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.

आयसीसीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहली बोलत होता. 'धोनीकडे भरपूर अनुभव आहे. तो स्वत: उत्साहित आहे. धोनी आमच्या सगळ्यांसाठी कायमच मेंटर राहिल. आपल्या करियरच्या सुरुवातीलाच एवढी मोठी स्पर्धा खेळणाऱ्या तरुणांना याचा नक्कीच फायदा होईल. धोनीच्या सल्ल्यामुळे आम्हाला एक ते दोन टक्के आणखी चांगली कामगिरी करायला मदत होईल,' असं वक्तव्य विराटने केलं. एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने शुक्रवारी आयपीएलचा किताब चौथ्यांदा जिंकला.

राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच?

टी-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) टीम इंडियाचे प्रशिक्षक राहणार नाहीत. शास्त्रींऐवजी राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा कोच होईल, असं वृत्त आहे. राहुल द्रविडनेही कोच व्हायला होकार दिला असल्याचं सांगतिलं जात आहे. यावरही विराट कोहलीला प्रश्न विचारण्यात आला. कोचच्या नियुक्तीबाबत काय चालू आहे, हे मला माहिती नाही. आम्ही यावर चर्चा केलेली नाही. आमचं लक्ष्यं वर्ल्ड कप जिंकणं आहे, असं विराट कोहली म्हणाला. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

48 वर्षांचा राहुल द्रविड मागच्या 6 वर्षांपासून भारत ए आणि अंडर-19 टीमचं कोचिंग करत आहे. द्रविडच्या देखरेखीखालीच ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, शुभमन गिल. हनुमा विहारी आणि आवेश खान हे खेळाडू तयार झाले. राहुल द्रविड सध्या एनसीएसचा प्रमुख आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतर लगेचच टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात टी-20 आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. या सीरिजपासूनच द्रविड टीम इंडियाचा कोच होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Rahul dravid, T20 world cup, Team india, Virat kohli