मुंबई, 7 नोव्हेंबर : सध्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा चांगलीच रंगात आलीय. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात होत असून, अनेक धक्कादायक निकाल या स्पर्धेत लागले आहेत. नेदरलॅंड्सकडून साउथ आफ्रिकेचा पराभव झाल्याने पाकिस्तानचा सेमी-फायनलमधला प्रवेश नक्की झाला आहे. तसंच, टीम इंडियाने झिबाब्वेवर 71 रन्सनी दणदणीत विजयही मिळवला आहे. टीम इंडियाने ‘ग्रुप बी’च्या गुणतालिकेत पहिलं स्थान कायम राखलं आहे. तसंच सेमीफायनलमध्येही प्रवेश केला आहे. झिंबाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये विकेटकीपर दिनेश कार्तिकला विश्रांती दिली होती. त्याऐवजी ऋषभ पंतला संधी दिली गेली. त्या मॅचमध्ये तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही; मात्र तरीही तो सेमी-फायनलमध्ये खेळू शकतो, अशी चर्चा केली जात आहे. भारतीय टीम आता सेमी-फायनलमध्ये इंग्लंड टीमच्या विरुद्ध खेळेल. ही मॅच 10 नोव्हेंबरला होणार आहे. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांना ऋषभ पंतविषयी प्रश्न विचारण्यात आला. पंतच्या झिबाब्वेविरुद्धच्या खेळीवरून तो सेमीफायनलमध्ये खेळणार का असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाला उत्तर देताना कोच राहुल द्रविड म्हणाले, की पंतच्या परफॉर्मन्सविषयी काळजीचं काही कारण नाही. ऋषभ पंतच्या पात्रतेवर विश्वास आहे द्रविड मीडियाशी बोलताना म्हणाले, अनेकदा प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंचा विचार करून आपल्या टीममध्येही बदल करावे लागतात. तसंच प्रतिस्पर्ध्यांच्या विशिष्ट बॉलर्ससमोर टिकण्यासाठी कुठल्या गुणवान खेळाडूची गरज आहे हे पाहावं लागतं. यामुळे असे निर्णय घेताना सर्व बाबींचा विचार करावा लागतो. परंतु, टीम व्यवस्थापनाच्या मनात पंतच्या गुणवत्तेविषयी अजिबात शंका नाही. टीम इंडियासाठी ‘अनलकी अंपायर’ सेमी फायनलला मैदानात उतरणार का नाही? पाहा मोठी अपडेट पिचनुसार खेळाडूंची निवड द्रविड म्हणाले, टीम इंडियाच्या फायनल अकरा जणांची टीम अॅडिलेडचं पिच कसं असेल यानुसार ठरेल. आम्ही तिकडे जाऊन एकंदर परिस्थितीचा अंदाज घेऊनच काय ते ठरवू. कारण, पाकिस्तान आणि बांग्लादेशसोबत खेळताना पिच थोडंसं स्लो झालं होतं आणि बॉलही चांगला स्पिन होत होता. त्यामुळे इंग्लंड टीमच्या स्पिनर्सचा विचार करता इंडियन टीममध्ये डावखुर्या बॅट्समनला संधी मिळण्याची शक्यता आहे. एका मॅचवरून परफॉर्मन्स ठरवणं शक्य नाही टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड म्हणाले, ‘एका मॅचवरून एखाद्या खेळाडूच्या गुणवत्तेविषयी ठरवणं मला योग्य वाटत नाही. त्यांना खेळवण्याचा निर्णय एका मॅचवरून नक्कीच करता येत नाही.’ झिंबाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये पंतने केवळ तीन रन्स केल्या होत्या. टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी-फायनलच्या मॅचेस 9 आणि 10 तारखेला होणार आहेत. संपूर्ण क्रिकेटजगताचं लक्ष या दोन मॅचेसकडे लागलं आहे. तसंच फायनलमध्ये कोणत्या दोन टीम्स प्रवेश करतील याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी, रोहित टीममध्ये करणार एक बदल!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.