जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup 2021 : विराट नाही तर या खेळाडूमुळे अश्विनचं 4 वर्षांनी कमबॅक!

T20 World Cup 2021 : विराट नाही तर या खेळाडूमुळे अश्विनचं 4 वर्षांनी कमबॅक!

T20 World Cup 2021 : विराट नाही तर या खेळाडूमुळे अश्विनचं 4 वर्षांनी कमबॅक!

टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) भारतीय टीमची (Team India) बुधवारी घोषणा करण्यात आली. ऑफ स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) याचं तब्बल 4 वर्षांनी मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) भारतीय टीमची (Team India) बुधवारी घोषणा करण्यात आली. ऑफ स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) याचं तब्बल 4 वर्षांनी मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं आहे. पण इतक्या वर्षांनी अश्विनचं टीममध्ये कमबॅक कसं झालं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत आता माहिती समोर आली आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अश्विनच्या पुनरागमनात महत्त्वाची भूमिका निभावली. टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मा अश्विनचं टी-20 टीममध्ये पुनरागमन व्हावं, यासाठी आग्रही होता. याबाबत कर्णधार विराट कोहलीलाही (Virat Kohli) विचारण्यात आलं, तेव्हा त्यानेही रोहितच्या बोलण्याचं समर्थन केलं, पण वॉशिंग्टन सुंदरची (Washington Sundar) कामगिरी खराब झाली किंवा तो फिट झाला नाही, तर अश्विनला टीममध्ये स्थान देण्यात यावं, असं विराट म्हणाला. अंगठ्याच्या दुखापतीमुळे सुंदर बाहेर झाल्यामुळे अश्विनची निवड निश्चित झाली. निवड समितीच्या बैठकीत विराट आणि रोहित यांनी अश्विनचं कौतुक केलं, तसंच आयपीएलदरम्यान युएईमध्ये अश्विनला खेळणं कठीण गेल्याचंही दोघांनी सांगितलं. वर्ल्ड कपही युएईमध्ये होणार आहे, तिथल्या संथ खेळपट्ट्यांवर अश्विन आणखी घातक होईल, असं दोघांचं म्हणणं होतं. आयपीएल 2020 नंतर अश्विनने पॉवरप्लेमध्ये डावखुऱ्या बॅट्समनना 70 बॉल टाकले, यात त्याने फक्त 6.77 च्या इकोनॉमी रेटने रन दिल्या, तसंच त्याची बॉलिंग सरासरीही 26.33 ची राहिली. यादरम्यान त्याने 7 विकेट घेतल्या. पॉवरप्लेमध्ये अश्विनपेक्षा जास्त विकेट दुसऱ्या कोणत्याही स्पिनरला मिळाल्या नाहीत. वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, राहुल चहर, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, वरुण चक्रवर्ती राखीव खेळाडू श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात