जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup : पैशांपेक्षा देश महत्त्वाचा! MS Dhoni ने पुन्हा जिंकलं मन

T20 World Cup : पैशांपेक्षा देश महत्त्वाचा! MS Dhoni ने पुन्हा जिंकलं मन

T20 World Cup : पैशांपेक्षा देश महत्त्वाचा! MS Dhoni ने पुन्हा जिंकलं मन

आयपीएल 2021 (IPL 2021) संपल्यानंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार 17 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होईल, तर भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दुबई, 12 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) संपल्यानंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार 17 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होईल, तर भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला होणार आहे. या टी-20 वर्ल्ड कपसाठी एमएस धोनीला (MS Dhoni) टीम इंडियाचा मेंटर करण्यात आलं आहे. 2007 साली धोनीच्याच नेतृत्वात भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता, यानंतर मात्र या कामगिरीची पुनरावृत्ती टीम इंडियाला करता आली नाही. 14 वर्षांचा हा वनवास यंदा संपवण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचा मेंटर म्हणून एमएस धोनी कोणतंही मानधन किंवा पैसे घेणार नाही, असं बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी सांगितलं आहे. एमएस धोनीला ही जबाबदारी देण्यात आली, कारण त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 सालचा टी-20 वर्ल्ड कप, 2011 चा वनडे वर्ल्ड कप आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. विराट कोहलीची कर्णधार म्हणून ही अखेरची स्पर्धा आहे. वर्ल्ड कपनंतर आपण टी-20 फॉरमॅटचं कर्णधारपद सोडणार आहोत, असं विराटने आधीच सांगितलं आहे. विराटच्या नेतृत्वात भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही, त्यामुळे कॅप्टन्सी करियरचा शेवट गोड करण्यासाठी तोदेखील जीवाचं रान करेल. टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी स्टॅण्डबाय खेळाडू श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर मेंटर : एमएस धोनी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात