मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : ना विराट ना रोहित, हा खेळाडू ठरणार टीम इंडियाचा X Factor!

T20 World Cup : ना विराट ना रोहित, हा खेळाडू ठरणार टीम इंडियाचा X Factor!

युएई आणि ओमानमध्ये टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये टीम इंडिया जिंकण्याची प्रबळ दावेदार मानली जात आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला होणार आहे. याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) टीम इंडियाचा एक्स-फॅक्टर सांगितला आहे.

पुढे वाचा ...

दुबई, 18 ऑक्टोबर : आयपीएल संपल्यानंतर लगेचच युएई आणि ओमानमध्ये टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये टीम इंडिया जिंकण्याची प्रबळ दावेदार मानली जात आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला होणार आहे. याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) टीम इंडियाचा एक्स-फॅक्टर सांगितला आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीर म्हणाला, 'केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि वरुण चक्रवर्ती चांगले खेळतील, पण माझ्यामते जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टीम इंडियाचा एक्स फॅक्टर असेल.' गंभीरच्या या मताशी भारताचा माजी ऑल राऊंडर इरफान पठाणनेही (Irfan Pathan) सहमती दर्शवली.

'जेव्हा आपण वरुण चक्रवर्तीबद्दल बोलतो, तेव्हा तो चांगली कामगिरी करू शकतो, कारण तो मिस्ट्री स्पिनर आहे. तो चांगल्या फॉर्ममध्येही आहे. पण बुमराह भारताचा एक्स-फॅक्टर असेल, असं मला तरी वाटतं. दुसऱ्या कोणत्या टीममध्ये बुमराहपेक्षा मोठा एक्स-फॅक्टर नसेल,' असं इरफान पठाण म्हणाला.

विराट कोहलीची टी-20 कर्णधार म्हणून ही शेवटची स्पर्धा आहे, यावरही गंभीरने भाष्य केलं. 'विराटला सध्या फक्त टी-20 वर्ल्ड कप जिंकायचा आहे. संपूर्ण टीमलाही तेच करायचं आहे, कारण 14 वर्षांचा काळ लोटला आहे. हे फक्त विराट कोहलीसाठी नाही, कारण तो टी-20 मध्ये अखेरची कॅप्टन्सी करतोय, हे फक्त स्पर्धा जिंकण्यासाठी आहे,' अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली.

'एमएस धोनी (MS Dhoni Mentor) त्या खेळाडूंसाठी महत्त्वाचा असेल, जे पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कप खेळत आहेत. युवा खेळाडूंसोबत तो आपला अनुभव शेयर करेल. वर्ल्ड कप खेळणं खूप वेगळं असतं, तुम्हाला अनुभवी माणसाची गरज असते, ज्याने आधी ही स्पर्धा खेळली आहे. धोनी नक्कीच तरुण खेळाडूंसोबत आपला अनुभव शेयर करेल,' असं वक्तव्य गंभीरने केलं.

टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, आर अश्विन

राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल

First published:
top videos

    Tags: Jasprit bumrah, T20 world cup, Team india