मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup IND vs SCO : 39 बॉलमध्येच टीम इंडियाचा विजय, नेट रनरेट रॉकेटसारखा उडाला!

T20 World Cup IND vs SCO : 39 बॉलमध्येच टीम इंडियाचा विजय, नेट रनरेट रॉकेटसारखा उडाला!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने (India vs Scotland) धमाका केला आहे. स्कॉटलंडने दिलेलं 86 रनचं आव्हान टीम इंडियाने 6.3 ओव्हरमध्येच पार केलं.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने (India vs Scotland) धमाका केला आहे. स्कॉटलंडने दिलेलं 86 रनचं आव्हान टीम इंडियाने 6.3 ओव्हरमध्येच पार केलं.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने (India vs Scotland) धमाका केला आहे. स्कॉटलंडने दिलेलं 86 रनचं आव्हान टीम इंडियाने 6.3 ओव्हरमध्येच पार केलं.

दुबई, 5 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने (India vs Scotland) धमाका केला आहे. स्कॉटलंडने दिलेलं 86 रनचं आव्हान टीम इंडियाने 6.3 ओव्हरमध्येच पार केलं. एवढ्या मोठ्या विजयामुळे टीम इंडियाच्या नेट रनरेटला बूस्टर डोस मिळाला आहे. भारताचा नेट रनरेट आता न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानपेक्षाही चांगला झाला आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना केएल राहुलने 19 बॉलमध्ये 50 तर रोहित शर्माने 16 बॉलमध्ये 30 रन केले. सूर्यकुमार यादव 6 रनवर आणि विराट कोहली 2 रनवर नॉट आऊट राहिले.

या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारताने स्कॉटलंडचा 85 रनवर ऑल आऊट केला. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराहला 2 विकेट घेण्यात यश आलं. स्कॉटलंडचे तीन बॅट्समन शून्य रनवर तर दोघं एक रनवर आऊट झालं. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अखेर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) टॉस जिंकण्यात यश आलं. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात (India vs Scotland) विराटने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला वर्ल्ड कपच्या पहिल्या तिन्ही सामन्यात टीम इंडियाला टॉस हरल्यानंतर पहिले बॅटिंग करावी लागली होती. यातले पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने भारताने गमावले, तर अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा 66 रनने दणदणीत विजय झाला.

स्कॉटलंडविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहलीने टीममध्ये एक बदल केला. शार्दुल ठाकूरऐवजी (Shardul Thakur) वरुण चक्रवर्तीचं (Varun Chakravarthy) टीममध्ये पुनरागमन झालं.  अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना सूर गवसला.

सेमी फायनलचं समीकरण

पहिल्या दोन सामन्यांमध्ये झालेल्या पराभवामुळे भारताचं सेमी फायनलला पोहोचणं अत्यंत धूसर झालं आहे. पाकिस्तानच्या टीमने आधीच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे, आता न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी स्पर्धा आहे.

टीम इंडियाचे उरलेला सामना नामिबियाविरुद्ध (Namibia) आहेत. भारताचा पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने आणि न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेटने पराभव झाला. या दोन्ही मोठ्या पराभवामुळे टीम इंडियाचा नेट रनरेट खराब झाला, पण अफगाणिस्तानविरुद्ध 66 रनने विजय झाल्यामुळे आणि आता स्कॉटलंडविरुद्ध एवढा मोठा विजय मिळवल्यामुळे भारताचा नेट रनरेट सुधारला. असं असलं तरी टीम इंडियाला नामिबियाविरुद्धचा सामनाही मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. यानंतर अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवलं तर तिन्ही टीमच्या खात्यात प्रत्येकी 6-6 पॉईंट्स असतील, त्यामुळे ज्या टीमचा नेट रनरेट चांगला असेल त्यांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश होईल.

First published:
top videos

    Tags: T20 world cup, Team india