जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs PAK : भारत-पाकिस्तान मॅचचा तणाव, 1 लाख प्रेक्षक, हार्दिक एकच शब्द बोलला अन् विराटने इतिहास घडवला

IND vs PAK : भारत-पाकिस्तान मॅचचा तणाव, 1 लाख प्रेक्षक, हार्दिक एकच शब्द बोलला अन् विराटने इतिहास घडवला

फोटो सौजन्य : आयसीसी

फोटो सौजन्य : आयसीसी

IND vs PAK t20i world cup 2022 टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला आहे. विराट कोहली हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मेलबर्न, 23 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला आहे. विराट कोहली हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला, त्याने पाकिस्तानच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. विराटने 53 बॉलमध्ये नाबाद 82 रनची खेळी केली, यामध्ये 4 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. पाकिस्तानने दिलेल्या 160 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था खराब झाली होती. 31 रनवरच भारताने 4 विकेट गमावल्या होत्या, पण विराटने हार्दिक पांड्याच्या मदतीने भारताला रोमांचक विजय मिळवून दिला. विराट आणि हार्दिक यांच्यात 113 रनची पार्टनरशीप झाली. भारत-पाकिस्तान मॅचचा तणाव आणि समोर एक लाख प्रेक्षक असताना डोक्यामध्ये काय सुरू होतं? असा प्रश्न विराटला विचारण्यात आला. हार्दिक माझ्यासोबत होता त्याने बिलिफ (विश्वास) हा शब्द वापरला. आपण शेवटपर्यंत राहिलो तर जिंकू, विश्वास ठेव आपण जिंकू, असं हार्दिक मला सारखं सांगत होता, असं विराट कोहली म्हणाला. IND vs PAK : 6 बॉल 16 रन, मेलबर्नमध्ये लास्ट ओव्हर ड्रामा, विराटच ‘बिग बॉस’! विराटची रणनीती या आव्हानाचा पाठलाग करताना 4 विकेट गमावल्यानंतर विराटने गेम प्लानही सांगितला. ‘शाहीन आफ्रिदी पॅव्हेलियन एण्डवरून बॉलिंग करायला आला तेव्हा आम्ही आक्रमण करायचं ठरवलं. हारिस राऊफ हा त्यांचा हुकमी एक्का होता. मी त्याला दोन सिक्स मारल्या. नवाझची एक ओव्हर शिल्लक होती. हारिसवर आक्रमण केलं तर त्यांच्यात घबराट पसरेल, हेच आमचं गणित होतं. 8 बॉलमध्ये 28 रनची गरज होती, पण 2 सिक्समुळे हेच गणित 6 बॉलमध्ये 16 रनवर आलं,’ अशी प्रतिक्रिया विराटने दिली. ‘आतापर्यंत मोहालीमधली ऑस्ट्रेलियाविरुद्धची माझी खेळी सर्वोत्तम होती, पण आता ही सर्वोत्तम आहे. हार्दिकने मला आत्मविश्वास दिला. प्रेक्षक आणि चाहत्यांचेही आभार, त्यांनीही कायमच पाठिंबा दिला आहे,’ अशी भावुक प्रतिक्रिया विराटने दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात