मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : भारताविरुद्ध पराभव, पण 24 तासात पाकिस्तान खूश, एका मॅचने बदललं समीकरण

T20 World Cup : भारताविरुद्ध पराभव, पण 24 तासात पाकिस्तान खूश, एका मॅचने बदललं समीकरण

टी-20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी भारताने पाकिस्तानवर शेवटच्या बॉलवर थरारक विजय मिळवला. या मॅचच्या 24 तासांमध्ये पाकिस्तानला दिलासा मिळाला आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी भारताने पाकिस्तानवर शेवटच्या बॉलवर थरारक विजय मिळवला. या मॅचच्या 24 तासांमध्ये पाकिस्तानला दिलासा मिळाला आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी भारताने पाकिस्तानवर शेवटच्या बॉलवर थरारक विजय मिळवला. या मॅचच्या 24 तासांमध्ये पाकिस्तानला दिलासा मिळाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

होबार्ट, 24 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी भारताने पाकिस्तानवर शेवटच्या बॉलवर थरारक विजय मिळवला. विराट कोहली भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. विराटने 53 बॉलमध्ये नाबाद 82 रन केले, यात 4 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. तर हार्दिक पांड्याने 37 बॉलमध्ये 40 रनची खेळी केली. भारताची अवस्था 31/4 अशी झालेली असताना विराटने पाकिस्तानच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला.

भारताविरुद्धच्या या पराभवाचा धक्का पाकिस्तानला बसल्यानंतर त्यांच्या सेमी फायनलला पोहोचण्यातही मोठा अडथळा निर्माण झाला होता, पण 24 तासांमध्येच पाकिस्तानचं टेन्शन कमी झालं आहे, याला कारण ठरली ती होबार्टमधली दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातली मॅच. पावसामुळे दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे यांच्यातली मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मॅच रद्द झाल्यामुळे दोन्ही टीमना प्रत्येकी 1-1 पॉईंट देण्यात आला आहे.

झाली रडायला सुरूवात! अंपायरच्या त्या निर्णयावर पाकिस्तानकडून आगपाखड

सुरूवातीपासूनच पाऊस पडत असल्यामुळे हा सामना 9 ओव्हरचा खेळवण्यात आला. पहिले बॅटिंग करणाऱ्या झिम्बाब्वेने 9 ओव्हरमध्ये 79/5 एवढा स्कोअर केला. पावसाने पुन्हा व्यत्यय आणल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 7 ओव्हरमध्ये 64 रनचं आव्हान मिळालं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आफ्रिकेने 51 रन केले, पण पुन्हा सुरू झालेला पाऊस थांबलाच नाही आणि अंपायरनी मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पाऊस सुरू झाला तेव्हा आफ्रिकेला विजयासाठी आणखी 14 रनची गरज होती. क्विंटन डिकॉक 18 बॉलमध्ये 47 रनवर नाबाद खेळत होता, त्यामुळे डिकॉकला आणखी एक ओव्हर मिळाली असती तर त्याला दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून द्यायची संधी होती, पण पावसाने दक्षिण आफ्रिकेचा घात केला.

'बापू'सोबत धोका! थर्ड अंपायरकडून मोठी चूक? भारत-पाकिस्तान सामना पुन्हा वादात

पाकिस्तानचा फायदा

ग्रुप-2 मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, नेदरलँड्स आणि बांगलादेश या 6 टीम आहेत. या 6 टीमपैकी 2 टीम सेमी फायनलला जाणार आहेत, त्यामुळे प्रत्येक टीमला सेमी फायनलला जाण्यासाठी 5 पैकी 4 मॅच जिंकणं गरजेचं आहे. 5 पैकी 3 मॅच जिंकल्या तर सेमी फायनलचं समीकरण नेट रनरेटवर जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याचा निकाल न लागल्याचा फटका दक्षिण आफ्रिकेला पुढे बसण्याची शक्यता आहे, कारण या सामन्यात आफ्रिका विजयाची प्रबळ दावेदार होती. आता दक्षिण आफ्रिकेचे उरलेले सामने भारत, पाकिस्तान, नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध आहेत. या चारही सामन्यांमध्ये आफ्रिकेचा विजय झाला तर ते थेट सेमी फायनलला प्रवेश करतील, पण चार पैकी एक सामना गमावला तरी त्यांना नेट रनरेटवर अवलंबून राहावं लागू शकतं, त्यामुळे दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे सामन्याचा निकाल न लागणं पाकिस्तानच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: India vs Pakistan, T20 world cup, T20 world cup 2022