मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'त्याच्याबद्दल अजिबात आदर नाही', या महान खेळाडूवर भडकला क्रिस गेल

'त्याच्याबद्दल अजिबात आदर नाही', या महान खेळाडूवर भडकला क्रिस गेल

कायमच मनमिळावू आणि विनोदी असणारा वेस्ट इंडिजचा क्रिस गेल (Chris Gayle) चांगलाच संतापला आहे. वेस्ट इंडिजचेच महान खेळाडू कर्टली एमब्रोज (Curtly Ambrose) यांच्यावर गेलने टीका केली आहे.

कायमच मनमिळावू आणि विनोदी असणारा वेस्ट इंडिजचा क्रिस गेल (Chris Gayle) चांगलाच संतापला आहे. वेस्ट इंडिजचेच महान खेळाडू कर्टली एमब्रोज (Curtly Ambrose) यांच्यावर गेलने टीका केली आहे.

कायमच मनमिळावू आणि विनोदी असणारा वेस्ट इंडिजचा क्रिस गेल (Chris Gayle) चांगलाच संतापला आहे. वेस्ट इंडिजचेच महान खेळाडू कर्टली एमब्रोज (Curtly Ambrose) यांच्यावर गेलने टीका केली आहे.

मुंबई, 14 ऑक्टोबर : कायमच मनमिळावू आणि विनोदी असणारा वेस्ट इंडिजचा क्रिस गेल (Chris Gayle) चांगलाच संतापला आहे. वेस्ट इंडिजचेच महान खेळाडू कर्टली एमब्रोज (Curtly Ambrose) यांच्यावर गेलने टीका केली आहे. एमब्रोज यांच्याविषयी आपल्याला आता अजिबात आदर उरला नाही, असं गेल म्हणाला आहे. गेलचा मागच्या 18 महिन्यांमधला फॉर्म बघता तो टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup West Indies) वेस्ट इंडिजच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये नसेल, असं एमब्रोज म्हणाले होते.

'मी जेव्हा वेस्ट इंडिजच्या टीममध्ये आलो तेव्हा मला एमब्रोज यांच्याविषयी आदर होता. टीममध्ये आल्यानंतर मी त्यांच्याकडेच बघायचो, पण निवृत्त झाल्यानंतर त्यांना माझ्याबद्दल असं का वाटतं, हे मला माहिती नाही. मीडियामध्ये जाऊन ते माझ्याबद्दल नकारात्मक बोलतात. त्यांना प्रसिद्धी हवी आहे का नाही, मला माहिती नाही, पण त्यांना ती मिळत आहे. मीदेखील त्यांना ती प्रसिद्धी देत आहे, ज्याची त्यांना गरज आहे,' असं गेल सेंट किट्समधल्या रेडियो स्टेशनशी बोलताना म्हणाला.

क्रिस गेल हा वेस्ट इंडिजच्या 2012 आणि 2016 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा भाग होता. 'मी तुम्हाला सांगतोय आणि हे जाऊन तुम्ही एमब्रोजला सांगा, की मला त्याच्याबद्दल अजिबात आदर उरलेला नाही. तो मला भेटला तर मीदेखील त्याला हेच सांगेन. नकारात्मकता संपव आणि टीमला टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाठिंबा दे, कारण टीमला याची गरज आहे. नकारात्मक उर्जेची नाही. इतर टीमचे माजी खेळाडू त्यांच्या टीमना पाठिंबा देतात, पण आपले खेळाडू मोठ्या स्पर्धांदरम्यान, हे का करत नाहीत,' असं वक्तव्य गेलने केलं.

'क्रिस गेल हा माझ्यासाठी थेट प्लेयिंग इलेव्हनमध्ये येत नाही, कारण मागच्या 18 महिन्यांमध्ये तो फक्त वेस्ट इंडिजकडून खेळतानाच नाही, तर फ्रॅन्चायजी क्रिकेटमध्येही संघर्ष करताना दिसला. घरच्या मैदानात झालेल्या सीरिजमध्येही गेलला रन करता आल्या नाहीत,' असं एमब्रोज म्हणाले होते.

क्रिस गेल यंदाची आयपीएलही (IPL 2021) अर्ध्यात सोडून गेला होता. 2021 मध्ये गेलने 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 17.46 च्या सरासरीने 227 रन केल्या, यात फक्त एकच अर्धशतक आहे.

First published:

Tags: Chris gayle, T20 world cup, West indies