मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

दोन दिवसांपूर्वी IPL Final खेळला, आता T20 World Cup च्या सामन्यासाठी मैदानात! 48 तासांच्या आत दुसऱ्या जर्सीत

दोन दिवसांपूर्वी IPL Final खेळला, आता T20 World Cup च्या सामन्यासाठी मैदानात! 48 तासांच्या आत दुसऱ्या जर्सीत

आयपीएल 2021 ची फायनल (IPL 2021 Final) संपल्यानंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे.

आयपीएल 2021 ची फायनल (IPL 2021 Final) संपल्यानंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे.

आयपीएल 2021 ची फायनल (IPL 2021 Final) संपल्यानंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे.

    अल अमेरत, 17 ऑक्टोबर : आयपीएल 2021 ची फायनल (IPL 2021 Final) संपल्यानंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात ओमानने पपुआ न्यू गिनीचा (Oman vs Papua New Guinea) 10 विकेटने पराभव केला. यानंतर आता बांगलादेश आणि स्कॉटलंड (Bangladesh vs Scotland) यांच्यातल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लाहने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या या टीममध्ये दोनच दिवसांपूर्वी आयपीएल फायनलमध्ये केकेआरकडून (KKR) खेळलेला शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) मैदानात उतरला आहे. याशिवाय आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळलेला मुस्तफिजूरही (Mustafizur Rahaman) बांगलादेशच्या टीममध्ये आहे. राजस्थानच्या टीमला आयपीएल प्ले-ऑफ गाठता आली नव्हती. 15 ऑक्टोबरला झालेल्या आयपीएल फायनलमध्ये शाकिबला चमकदार कामगिरी करता आली नाही. फायनलमध्ये पहिल्याच बॉलला शाकिब शून्य रनवर आऊट झाला, तसंच त्याने 3 ओव्हरमध्ये एकही विकेट न घेता 33 रन दिले. आयपीएल 2021 मध्ये केकेआरचा स्टार ऑलराऊंडर आंद्रे रसेल याला दुखापत झाल्यानंतर शाकिब अल हसनला खेळण्याची संधी मिळाली, पण त्याला संपूर्ण मोसमात संघर्ष करावा लागला. शाकिबने 8 मॅचमध्ये 9.40 च्या सरासरीने आणि 97.91 च्या स्ट्राईक रेटने फक्त 47 रन केले. तर बॉलिंगमध्ये त्याने 46.75 ची सरासरी आणि 7.19 च्या स्ट्राईक रेटने फक्त 4 विकेट घेतल्या. याआधी 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये शाकिब अल हसन शानदार फॉर्ममध्ये होता. 8 मॅचमध्ये शाकिबने 86.57 च्या स्ट्राईक रेटने 606 रन केले, यात दोन शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश होता. याशिवाय त्याने वर्ल्ड कपमध्ये 11 विकेटही घेतल्या. 2019 वर्ल्ड कपनंतर मात्र शाकिबचं निलंबन करण्यात आलं होतं. मॅच फिक्सरनी संपर्क साधल्याबद्दल शाकिबने आयसीसीला माहिती दिली नसल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. या टी-20 वर्ल्ड कपमध्येही 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपसारख्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी शाकिब आणि बांगलादेशची टीम उत्सुक असेल. बांगलादेशची टीम लिटन दास, सौम्य सरकार, शाकिब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, महमदुल्लाह, अफिफ हुसेन, नुरुल हसन, मेहेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, KKR, T20 world cup

    पुढील बातम्या