Home /News /sport /

T20 World Cup 2021 : टीम इंडियातील 15 सदस्य ठरले! वाचा संपूर्ण यादी

T20 World Cup 2021 : टीम इंडियातील 15 सदस्य ठरले! वाचा संपूर्ण यादी

टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडिया निश्चित झाली आहे. यूएई आणि ओमाममध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान हा वर्ल्ड कप होणार आहे.

    मुंबई 6 सप्टेंबर : टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडिया निश्चित झाली आहे. यूएई आणि ओमाममध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान हा वर्ल्ड कप होणार आहे. 2007 साली झालेला पहिला वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया यंदाही विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे.  या वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर आहे. निवड समितीनं टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्याशी टीम निवडीबाबत चर्चा केली आहे. त्या चर्चेनंतर अंतिम 15 जणांची टीमही निश्चित केली आहे. 'इनसाईड स्पोर्ट्स'नं दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी होणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट सध्या ओव्हलवर (India vs England 4th Test) सुरू आहे. या टेस्टनंतर टीम इंडियाची घोषणा होणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. या टीमची निवड कधी होणार हे ओव्हल टेस्टच्या निकालावर अवलंबून असल्याचं या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. 'टीम इंडियाची घोषणा कधी होणार हे ओव्हल टेस्टवर अवलंबून आहे. मॅच लवकर संपली तर घोषणा लवकर होऊ शकते. अन्यथा मंगळवारी टीम जाहीर होईल. टीम इंडियातील सर्व सदस्यांची नावं निश्चित झाली आहेत. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्याशी या विषयावर निवड समितीनं चर्चा केली आहे. त्यामध्येही याबाबत निर्णय झाला आहे. टीम इंडियातील अनेक जागा निश्चित आहेत. फक्त काही रिक्त जागांसाठी या बैठकीत चर्चा झाली आहे.' असं या सूत्रांनी सांगितलं आहे. IND vs ENG: ओव्हलमधून आली काळजीची बातमी! रोहित आणि पुजारामुळे वाढलं विराटचं टेन्शन T20 वर्ल्ड कपसाठी  संभाव्य टीम : केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कॅप्टन), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन राखीव आणि कव्हर : वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, पृथ्वी शॉ आणि प्रसिद्ध कृष्णा
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, T20 world cup

    पुढील बातम्या