Home /News /sport /

IND vs ENG: ओव्हलमधून आली काळजीची बातमी! रोहित आणि पुजारामुळे वाढलं विराटचं टेन्शन

IND vs ENG: ओव्हलमधून आली काळजीची बातमी! रोहित आणि पुजारामुळे वाढलं विराटचं टेन्शन

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील ओव्हल टेस्ट सध्या रंगतदार अवस्थेत आहे. आता पाचव्या आणि निर्णायक दिवशी विराट कोहलीचं (Virat Kohli) टेन्शन रोहित आणि पुजारामुळे वाढलं आहे.

    ओव्हल, 6 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील ओव्हल टेस्ट सध्या रंगतदार अवस्थेत आहे. टीम इंडियानं इंग्लंडला विजयासाठी 368 रनचं लक्ष्य ठेवलं आहे. त्याला उत्तर देताना इंग्लंडनं चौथ्या दिवसाच्या अखेरीस बिनबाद 77 रन काढले आहेत. आता इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या दिवशी 291 रनची गरज आहे. तर टीम इंडियाला 10 विकेट्स हव्या आहेत. टीम इंडियाचा आता पाचव्या दिवशी ही टेस्ट जिंकून 2-1 अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. पण त्यापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी विराट कोहलीचं (Virat Kohli) टेन्शन वाढवलं आहे. ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये या दोघांनीही दमदार खेळ केला आहे. रोहित शर्मानं 127 तर चेतेश्वर पुजारानं 61 रनची खेळी केली होती. या दोघांनी 153 रनच्या पार्टनरशिपमुळे टीम इंडियाला 466 रन करता आले होते. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमधील हे दोन्ही बॅट्समन रविवारी फिल्डिंगला उतरले नाहीत. रोहितच्या गुडघ्याला आणि पुजाराच्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटची चिंता वाढली आहे. ओव्हल टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बॅटींग करताना पुजाराचा पाय दुखावला होता. त्यामुळे त्यानं पायाला पट्टी लावून बॅटींग केली. तसंच रोहितचा गुडघा देखील दुखावला आहे. आता पाचव्या दिवशी हे दोघं फिल्डिंगला उतरणार का? हे अजून स्पष्ट नाही. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. IND vs ENG: टीम इंडियाच्या कामगिरीवर गांगुली खूश, ओव्हल टेस्टबद्दल केलं मोठं वक्तव्य ओव्हलनंतर तीनच दिवसांनी म्हणजे 10 सप्टेंबरपासून या सीरिजमधील पाचवी आणि शेवटची टेस्ट सुरू होणार आहे. या टेस्टसाठी रोहित आणि पुजारा हे दोघं फिट होणं टीम इंडियासाठी आवश्यक आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england

    पुढील बातम्या