अल अमेरत, 17 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) ओमान आणि युएईमध्ये सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात ओमानने पपुआ न्यू गिनीला (Oman vs Papua New Guinea) धूळ चारली आहे. पपुआ न्यू गिनीने दिलेलं 130 रनचं आव्हान ओमानने 13.4 ओव्हरमध्येच एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. जतिंदर सिंगने (Jatinder Singh) 42 बॉलमध्ये नाबाद 73 रन केले, तर अकिब इलियास 43 बॉलमध्ये 50 रनवर नाबाद राहिला. या सामन्यात ओमानचा कर्णधार झिशान मकसूद याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. ओमानच्या बॉलर्सनी त्यांच्या कॅप्टनचा हा निर्णय योग्य ठरवला.
Oman get their #T20WorldCup 2021 campaign off to a flyer 🔥
— T20 World Cup (@T20WorldCup) October 17, 2021
They come out 🔝 against Papua New Guinea with 10 wickets in hand.#T20WorldCup | #OMNvPNG | https://t.co/dYPcIueHIP pic.twitter.com/z2qliBaXHQ
ओमानकडून कर्णधार झिशान मकसूदने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर बिलाल खान आणि कलिमुल्लाहला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. पपुआ न्यू गिनीचा कर्णधार असद वालाने सर्वाधिक 56 रनची खेळी केली, तर चार्ल्स अमिनीने 37 रन केले. पपुआ न्यू गिनीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 129 रनच करता आले. T20 World Cup सुरू होताच समोर आला इमोशनल Photo, मैदानात ढसाढसा रडायला लागला टीमचा सदस्य टी-20 वर्ल्ड कपच्या क्वालिफायर राऊंडला आजपासून सुरुवात झाली आहे. क्वालिफायर राऊंडमध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी असे दोन ग्रुप करण्यात आले आहेत. क्वालिफायर राऊंडच्या दोन्ही ग्रुपमधल्या टॉप-2 टीम म्हणजेच एकूण 4 टीम सुपर-12 मध्ये प्रवेश करतील. 23 ऑक्टोबरपासून सुपर-12 राऊंडला सुरुवात होणार आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत पहिल्या 8 क्रमांकावर असणाऱ्या टीमना थेट सुपर-12 मध्ये प्रवेश मिळाला आहे.