दुबई, 15 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) पराभव करत पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. पण या विजयासोबत ऑस्ट्रेलियाच्या एका जोडीने अनोख रेकॉर्ड केलं आहे. सध्या क्रिकेट जगतात मिचेल स्टार्क आणि त्याची पत्नी अॅलिसा हीली (Mitchell Starc and Alyssa Healy) या दोघांची जोरदार चर्चा रंगली असल्याचे पाहायली मिळत आहे. याचे कारणही तसेच आहे. मिचेल स्टार्क आणि अॅलिसा हिली हे सध्या क्रिकेट जगतातील पॉवर कपल मानले जात आहे. कारण जे यश या दोघा पती-पत्नींनी मिळवले आहे, ते आतापर्यंतच्या जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही जोडप्याला मिळालेले नाही. अॅलिसा हीली ही ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक इयान हिलीची भाची आहे. पण त्याची ओळख त्याहून अधिक आहे. एलिसा हिली ही ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची विकेटकिपरसह उत्कृष्ट बॅट्समन आहे. आणि ती तिच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे . अॅलिसा हिलीने ऑस्ट्रेलियासाठी पाच टी-२० विश्वचषक जिंकले आहेत. 2018 च्या T20 विश्वचषकातही ती प्लेअर ऑफ द टूर्नामेंट होती.
Mitchell Starc and Alyssa Healy are the current champions of the T20 World Cup 🤯
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 14, 2021
Couple goals 🏆🏆#T20WorldCup | #T20WorldCupFinal | #NZvAUS pic.twitter.com/wgdRGd5pdX
अॅलिसा 2020 टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरली. तिने भारताविरुद्ध 39 चेंडूत 75 धावा केल्या होत्या. अॅलिसा हिली ही महिला क्रिकेटची सुपरस्टार आहे. आणि तिचा पती मिचेल स्टार्क पुरुष क्रिकेटमध्ये स्टार खेळाडू आहे. मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज आहे.. तो 2015 च्या वन डे वर्ल्ड कपची हिरो ठरला आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आहे. आणि यंदाचा टी-20 वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा तो एक भाग आहे. या विजेतेपदासह मिचेल स्टार्क आणि अॅलिसा हिली हे T20 विश्वचषक जिंकणारे पहिले आणि एकमेव जोडपे ठरले आहेत. मात्र, या सामन्यात स्टार्कने आपल्या गोलंदाजीने एक लाजिरवाणा विक्रमही केला. त्याने चार षटकात एकही विकेट न घेता ६० धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाचे पहिले T20 विश्वचषक विजेतेपद. आणि हे साध्य करण्यासाठी कांगारूंना 15 वर्षे वाट पाहावी लागली.