दुबई, 19 ऑक्टोबर : स्कॉटलंडची टीम टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्या राऊंडमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशचा (Scotland vs Bangladesh) पराभव केल्यानंतर आता स्कॉटलंडने दुसऱ्या मॅचमध्ये पपुआ न्यू गिनीचा 17 रननी पराभव केला, त्यामुळे स्कॉटलंडची टीम त्यांच्या ग्रुपमध्ये टॉपवर पोहोचली आहे. या कामगिरीमुळे सुपर-12 मध्ये क्वालिफाय होण्याची स्कॉटलंडची शक्यताही वाढली आहे. एकीकडे स्कॉटलंडची टीम मैदानामध्ये चमकदार कामगिरी करत असतानाच त्यांच्या टीमची 12 वर्षांची समर्थक सोशल मीडियावर चांगलीच हिट झाली आहे. या मुलीचं नाव आहे रेबेका डाउनी (Rebecca Downie). या मुलीने स्कॉटलंडची यंदाच्या वर्ल्ड कपमधली जर्सी डिझाईन केली आहे. क्रिकेट स्कॉटलंडने या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. स्कॉटलंडची जर्सी घालून टीमचा बांगलादेशविरुद्धचा सामना बघतानाचा फोटो क्रिकेट स्कॉटलंडने शेयर केला आहे. तसंच त्यांनी रेबेकाला धन्यवादही दिले आहेत.
Scotland's kit designer 👇
— Cricket Scotland (@CricketScotland) October 19, 2021
12 year-old Rebecca Downie from Haddington 👋
She was following our first game on TV, proudly sporting the shirt she designed herself 👏
Thank you again Rebecca!#FollowScotland 🏴 | #PurpleLids 🟣 pic.twitter.com/dXZhf5CvFD
स्कॉटलंडचा लागोपाठ दुसरा विजय स्कॉटलंडने स्पर्धेतला लागोपाठ दुसरा विजय मिळवला आहे. टीमने क्वालिफायर सामन्यामध्ये पपुआ न्यू गिनीचा 17 रननी पराभव केला. याचसोबत टीम ग्रुप बीमध्ये 4 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर गेली आहे. रिची बेरिंग्टनच्या 70 रन्या खेळीमुळे स्कॉटलंडने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 165 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना पपुआ न्यू गिनीला 148 रनपर्यंतच पोहोचता आलं. स्कॉटलंडच्या रिची बेरिंग्टनने 49 बॉलमध्ये 6 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 70 कन केले. रिचीने मॅथ्यू क्रॉससोबत तिसऱ्या विकेटसाठी 92 रनची पार्टनरशीप केली. याआधी स्कॉटलंडने आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशा 6 रनने पराभव केला होता. स्कॉटलंडविरुद्धच्या या पराभवामुळे बांगलादेशचं सुपर-12ला पोहोचणं कठीण झालं आहे. वर्ल्ड कपआधी बांगलादेशने घरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा पराभव केला होता. Amazon Driver ते World Cup Star: स्कॉटलंडच्या ऑल राऊंडरचा आहे थक्क करणारा प्रवास