मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Amazon Driver ते World Cup Star: स्कॉटलंडच्या ऑल राऊंडरचा आहे थक्क करणारा प्रवास

Amazon Driver ते World Cup Star: स्कॉटलंडच्या ऑल राऊंडरचा आहे थक्क करणारा प्रवास

टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) पहिल्याच दिवशी स्कॉटलंडनं बांगलादेशचा पराभव करत खळबळजनक निकाल (Bangladesh vs Scotland) नोंदवला आहे.

टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) पहिल्याच दिवशी स्कॉटलंडनं बांगलादेशचा पराभव करत खळबळजनक निकाल (Bangladesh vs Scotland) नोंदवला आहे.

टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) पहिल्याच दिवशी स्कॉटलंडनं बांगलादेशचा पराभव करत खळबळजनक निकाल (Bangladesh vs Scotland) नोंदवला आहे.

मुंबई, 18 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) पहिल्याच दिवशी स्कॉटलंडनं बांगलादेशचा पराभव करत खळबळजनक निकाल (Bangladesh vs Scotland) नोंदवला आहे. स्कॉटलंडचा ऑल राऊंडर ख्रिस ग्रिव्हज (Chris Greaves) या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार होता. 6 आऊट 53 अशा अडचणीच्या परिस्थितीत सापडलेल्या स्कॉटलंडनं ख्रिसच्या 28 बॉल 45 रनच्या जोरावर 140 पर्यंत मजल मारली. त्यानंतर त्यानं 2 महत्त्वाच्या विकेट्स घेत बांगलादेशच्या इनिंगला ब्रेक लावला. बांगलादेशची टीम निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 134 रनच करु शकली.

स्कॉटलंडचा कॅप्टन काईल कोएत्जरनं या विजयानंतर ख्रिसच्या खेळाची जोरदार प्रशंसा केली. काही महिन्यापूर्वी अ‍ॅमेझॉनचे पार्सल पोहचवणाऱ्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या ख्रिसनं हा प्रवास करण्यासाठी मोठे कष्ट घेतले आहेत, असे काईलनं सांगितले. आजचा दिवस त्याच्यासाठी अविस्मरणीय होता, पण त्याच्या या खेळाचं आम्हाला आश्चर्य वाटले नाही. टीमला त्याच्या क्षमतेवर विश्वास होता. तो काही महिन्यांपूर्वी अ‍ॅमेझॉनचे पार्सल देण्याचं काम करत होता. आज त्याला वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेश विरुद्धच्या मॅचमध्ये 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळत आहे.' असे काईल म्हणाला.

दुसरीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या ख्रिस ग्रिव्हजनं सातव्या विकेटसाठी मार्क वॅटसोबत 51 रनची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. त्यानंतर त्यानं शाकीब अल हसन आणि मुशफिकूर रहीम या बांगलादेशच्या दोन मोठ्या बॅटर्सना आऊट करत स्कॉटलंडच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

IPL 2021 मधील फ्लॉप खेळाडूचा T20 World Cup मध्ये रेकॉर्ड, मलिंगाला टाकलं मागं

या मॅचमध्ये बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लाहने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर स्कॉडलंडने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 140 रन केले. क्रिस ग्रीव्हजने सर्वाधिक 45 रन तर मुनसीने 29 आणि मार्क वॅटने 22 रनचं योगदान दिलं. बांगलादेशकडून मेहेदी हसनने सर्वाधिक 3 विकेट पटकावल्या. मुस्तफिजूर आणि शाकिब अल हसनला प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं आणि सैफुद्दीननला एक विकेट मिळाली.

स्कॉडलंडने दिलेल्या 141 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 134 रनच करता आले. बांगलादेशकडून मुशफिकरु रहीमने (Mushfiqur Rahim) सर्वाधिक 38 रनची खेळी केली, तर कर्णधार महमदुल्लाह (Mahamadullah) 23 रन करून आऊट झाला.

First published:
top videos

    Tags: Cricket news, T20 world cup