नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धेत टीम इंडियाच्या प्रवासासह मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला. शास्त्रींच्या जागी राहुल द्रविडची (Rahul Dravid) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता शास्त्री काय करणार असा सवाल उपस्थित होत असतानाच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने ‘कमेंट्री बॉक्समध्ये परत ये मित्रा’ अशी भावूक अंर्तहाक दिली आहे.
अक्रमने सोशल मीडियाद्वारे मुख्य प्रशिक्षक पदावरुन पायउतार झालेल्या रवी शास्त्रींसंदर्भात सोशल अकाऊंटवर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘माझा चांगला मित्र, रवी. प्रशिक्षक म्हणून ही तुझी शेवटची स्पर्धा होती आणि मला वाटते की तू गेल्या तीन वर्षांत चांगली कामगिरी केली आहे.
तू तुझी जबाबदारी उत्कृष्टपणे सांभाळली आहे, अभिनंदन मित्रा’ असे म्हणत शास्त्रींना कॉमेंट्री बॉक्समध्ये परतण्यासाठी दरवाजे खुले असल्याचेही वसीम अक्रमने सांगितले. आणि 'कमेंट्री बॉक्समध्ये परत ये मित्रा.’अशी अंर्तहाक अक्रमने यावेळी शास्त्रींना दिली.
तसेच, विराट कोहलीच्या कर्णधारपदावरही वसीम अक्रम याने आपले मत मांडले आहे. टी२० कर्णधार म्हणून कोहलीचा शेवटचा सामना आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत नामिबियाविरुद्ध होता.
विराट कोहलीसारख्या उत्कृष्ट खेळाडूला टी२० संघाचा कर्णधार म्हणून निरोप घेताना शुभेच्छा. टी२० कर्णधारपदाच्या शेवटच्या दिवशी, आम्ही त्याचे नेतृत्व पुन्हा पाहिले जेव्हा त्याने सूर्यकुमार यादवला नामिबियाविरुद्धचा सामना संपवण्यासाठी फलंदाजीसाठी पाठवले, हे काम तो स्वतः करू शकला असता. सामन्यात चांगली कामगिरी केल्यामुळे नामिबियाचेही अभिनंदन. पण माझे मन माझे मित्र रवी शास्त्री यांच्यासोबत असल्याचे अक्रमने पोस्टमध्ये म्हटले आहे.
रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. तर रोहित शर्मा आता टी२० संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. केएल राहुल उपकर्णधार म्हणून भारतीय टी२० संघाची जबाबदारी सांभाळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ravi shashtri, Ravi shastri, Virat kohli