Home /News /sport /

Mumbai Indians ना पस्तावा, रोहितने दाखवला नाही विश्वास, त्यानेच 10 बॉलमध्ये ठोकले 52 रन, VIDEO

Mumbai Indians ना पस्तावा, रोहितने दाखवला नाही विश्वास, त्यानेच 10 बॉलमध्ये ठोकले 52 रन, VIDEO

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) टीम डेव्हिडवर (Tim David) विश्वास दाखवला नाही, पण त्याने इंग्लंडमधल्या टी-20 ब्लास्टमध्ये धमाका केला आहे. लँकशायरकडून खेळताना डेव्हिडने 32 बॉलमध्ये 66 रन केले. डेव्हिडने त्याच्या या खेळीमध्ये 4 फोर आणि 6 सिक्स मारल्या. म्हणजेच त्याने 10 बॉलमध्येच 52 रन ठोकले

पुढे वाचा ...
    लंडन, 9 जून : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली. 15 मोसमांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिली. एवढच नाही तर पहिल्या आठही सामन्यांमध्ये पराभव झालेली मुंबई आयपीएलमधली पहिली टीम ठरली. मुंबईच्या या पराभवाचं खापर खेळाडूंचा खराब फॉर्म आणि चांगल्या खेळाडूंना न दिलेली संधी यावर फोडण्यात आलं. पहिल्या दोन मॅचनंतर मुंबईने आक्रमक खेळाडू टीम डेव्हिडला (Tim David) टीमबाहेर केलं, यानंतर शेवटच्या काही सामन्यांमध्ये रोहित शर्माने पुन्हा एकदा टीम डेव्हिडला संधी दिली, तेव्हा त्याने धमाका केला. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी-20 ब्लास्टमध्येही (Vitality T20 Blast) टीम डेव्हिडने विस्फोटक खेळी केली आहे. लँकशायरकडून खेळताना डेव्हिडने 32 बॉलमध्ये 66 रन केले. डेव्हिडने त्याच्या या खेळीमध्ये 4 फोर आणि 6 सिक्स मारल्या. म्हणजेच त्याने 10 बॉलमध्येच 52 रन ठोकले, ज्यामुळे लँकशायरने पहिले बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 213 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना यॉर्कशायरला 8 विकेट गमावून 209 रन करता आल्या. मॅचमध्ये एकूण 422 रन झाल्या, पण लँकशायरने 4 रनने रोमांचक विजय मिळवला. पहिले बॅटिंगसाठी उतरलेल्या लँकशायरची सुरूवात चांगली झाली नाही. फिल सॉल्ट 10 रन करून आऊट झाला. यानंतर किटन जेनिंग्स आणि स्टीवन क्राफ्टने इनिंग सांभाळली. जेनिंग्सने 42 आणि क्राफ्टने 41 रन केले, पण यानंतर पुन्हा एकदा त्यांची बॅटिंग अडखळली. टीमचा स्कोअर 100 रनवर 4 विकेट असा होता, पण टीम डेव्हिड आणि कर्णधार डेन विलासने 96 रनची पार्टनरशीप केली आणि स्कोअर 200 रनच्या पुढे नेला. 200 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग टीम डेव्हिड आणि डेन विलास यांनी 200 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. विलासने 20 बॉलमध्ये नाबाद 40 रन केले, यात एक फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर डेव्हिडने 206 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. डेव्हिडला उशीरा संधी आयपीएल 2022 मध्ये पहिल्या दोन मॅच खेळल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टीम डेव्हिडला बाहेर केलं. 6 मॅचनंतर कायरन पोलार्डच्याऐवजी मुंबईने डेव्हिडला संधी दिली, या संधीचं डेव्हिडने सोनं केलं. आयपीएलच्या 8 सामन्यांमध्ये डेव्हिडने 37.20 ची सरासरी आणि 216.27 च्या स्ट्राईक रेटने 186 रन केले, यामध्ये त्याने 12 फोर आणि 16 सिक्स ठोकल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Mumbai Indians

    पुढील बातम्या