मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

अवघ्या 36 बॉलमध्ये 100 रन्स; महिला क्रिकेटमधलं वेगवान शतकाचं नवं रेकॉर्ड हिने घातलं खिशात

अवघ्या 36 बॉलमध्ये 100 रन्स; महिला क्रिकेटमधलं वेगवान शतकाचं नवं रेकॉर्ड हिने घातलं खिशात

महिला क्रिकेट तसं तुलनेनं दुर्लक्षितच राहतं. मात्र आता या क्रिकेटपटूनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

महिला क्रिकेट तसं तुलनेनं दुर्लक्षितच राहतं. मात्र आता या क्रिकेटपटूनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

महिला क्रिकेट तसं तुलनेनं दुर्लक्षितच राहतं. मात्र आता या क्रिकेटपटूनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • Published by:  News18 Desk
वेलिंगटन, 14 जानेवारी : न्यूझीलंडची (New Zealand cricket) महिला क्रिकेटर सोफी डेवाइन (sophie devine record ) हिनं टी-20 मध्ये 36 बॉल्सवर शतक ठोकून मोठाच इतिहास रचला आहे. सोफी आता टी- 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करणारी महिला क्रिकेटर बनली आहे. सोफीनं 10 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे. याआधी वेस्टइंडिजच्या डायंड्रा डॉटीन हिनं २०१० मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध 38 बॉल्सवर शतक केलं होतं. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ग्रेस हॅरिसनं वुमन्स बिग बॅश लीग (WBBL) मध्ये खेळताना 42 बॉल्सवर सेंच्युरी केली होती. सोफी होम टूर्नामेंट सुपर स्मॅशमध्ये वेलिंग्टन ब्लेज टीमची कॅप्टन आहे. तिनं ओटागो स्पार्क्सच्या विरुद्ध 8 बॉल्सवर नाबाद 108 धावांचं ओव्हर खेळलं होतं. यादरम्यान तिनं 9 षटकार आणि तेवढेच चौकार मारले. तिनं आपल्या पहिल्या 50 धावा 21 बॉल्स आणि नंतरच्या 50 धावा 14 बॉल्समध्ये पूर्ण केल्या. ओटागोनं 129 धावांचं लक्ष्य दिलं होतं. वेलींग्टननं याला 8.4 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं. सोबतच सोफी न्यूजीलँडमध्ये सर्वात वेगवान टी-20 शतक बनवणारीही (महिला-पुरुष) बनली आहे. तिनं तिच्यात देशातील पुरुष टीमच्या टिम सेफर्ट याला मागं टाकलं. टिम यानं 2017 मध्ये नॉर्दर्न डिस्ट्रिक्टसाठी खेळताना ऑकलँडविरुद्ध माउंट माउनगुईमध्ये 40 बॉल्सवर शतक केलं होतं. हा सोफीचा वूमन्स सुपर स्मॅश टूर्नामेंटचा तिसरा हायएस्ट स्कोअरपण होता. याआधी 2013-14 मध्ये सारा मॅकग्लाशन हिनं ऑकलँड हाईट्सवरून खेळताना 131 धावा काढल्या होत्या. यानंतर हे सोफीचे दोन हाययेस्ट स्कोअर आहेत. टी-20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक करण्याचं रेकॉर्ड वेस्टइंडीजच्या क्रिस गेलच्या नावावर आहे. त्यानं 2013 च्या आयपीएलमध्ये 30 बॉल्सवर शतक केलं होतं.
First published:

Tags: New zealand, T-20 cricket

पुढील बातम्या