Home /News /sport /

हुकलेली IPL आणि Pub मधल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सुरेश रैनाला मोठा दिलासा

हुकलेली IPL आणि Pub मधल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सुरेश रैनाला मोठा दिलासा

IPL च्या 13 व्या मोसमातून अचानक माघार घेणारा सुरेश रैना पुढील वर्षी पुढच्या वर्षात तरी दिसणार का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता.

     मुंबई, 23 डिसेंबर: मुंबईच्या पबमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केलं म्हणून कारवाईला सामोरं जावं लागलेल्या सुरेश रैनाला एक गुड न्यूज मिळाली आहे. भारताचा तडाखेबाज फलंदाज सुरेश रैना (Suresh raina) सध्या अनेक अडचणींमधून जात आहे. यावर्षी त्याला काही वैयक्तिक कारणांमुळे IPL सोडावं लागलं होत. त्यामुळे पुढच्या वर्षी सुरेश रैना चेन्नईकडून (Chennai super kings) खेळणार की नाही? हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. परंतु त्याच्या या अडचणीमध्ये चाहत्यांना सुखावणारी एक चांगली बातमी (Good news) समोर आली आहे. कारण पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) साठी सुरेश रैना कोणत्या संघाकडून खेळणार हे आता स्पष्ट झालं आहे. IPL 2020 चा यंदाचा मोसम कोरोना नियमावलीत पार पडला. यावेळी चेन्नईचा संघ दुबईला गेला असता, तेथील हॉटेलमधून बाहेर पडणं सुरेश रैनासाठी आयपीएल 13 मधून पडल्यासारखं झालं आहे. रैनाला फ्रेचायझीने कथित शिस्तभंगाच्या मुद्यावरून काढून टाकलं होतं, असं असलं तरी अधिकृत कारण वैयक्तिक असल्याचं सांगितलं आहे. फ्रेचायझीसोबत झालेल्या वादामुळे आयपीएल मधील इतर संघ व्यवस्थापक रैनाला आपल्या संघात घेण्याच्या तयारीत होते. पण त्यांचा आता हिरमूड होणार आहे. कारण रैना पुढील वर्षाच्या आयपीएलसाठी चैन्नईकडूनच खेळणार आहे. 'पुढील वर्षी सुरेशा रैना आमच्याबरोबर असेल' अशी माहिती सीएसके व्यवस्थापनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबई मिररला दिली. पण पुढील आयपीएलपूर्वी केवळ मिनी लिलाव होण्याची शक्यता आहे. सीएसके व्यवस्थापनाने सुरेश रैनाच्या अटकेबाबत सांगितलं की, 'त्यांन रात्रीची संचारबंदीचे नियम मोडल्यामुळे सोमवारी मुंबई पोलिसांनी रैनाला अटक केली होती. आणि आता त्याची जामीनावर मुक्तता केली आहे. तो स्थानिक टाइम आणि नियमावलीबद्दल त्याला जागरुक नव्हता. त्याला अटक झाल्याची बातमी आम्ही वाचली, पण त्या घडामोडीबाबत आम्हाला फार काही बोलायचं नाही. तो पुढील वर्षी आमच्यासोबत खेळणार आहे, एवढंच आम्ही सांगू इच्छितो. सुरेश रैना हा सुरुवातीपासून चैन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळत आहे. मधल्या काळात 2016 आणि 2017 साली चैन्नईला आयपीएलमधून बाद ठरवल्यानंतर, तो इतर संघाकडून खेळला आहे. रैनाने आतापर्यंत चेन्नई संघासाठी 160 हून अधिक सामने खेळले आहेत आणि 4500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. सीएसकेच्या आतापर्यंतच्या यशात रैनाचा वाटा मोठा आहे. चैन्नई आतापर्यंत तीन आयपीएल चषक जिंकला आहे तर  सहा वेळा हा संघ उपविजेता ठरला  आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2020, Suresh raina

    पुढील बातम्या