जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / '... ही तर खेळाडूंची वैयक्तिक गोष्ट', बीसीसीआयच्या त्या निर्णयावर भडकले गावसकर

'... ही तर खेळाडूंची वैयक्तिक गोष्ट', बीसीसीआयच्या त्या निर्णयावर भडकले गावसकर

'... ही तर खेळाडूंची वैयक्तिक गोष्ट', बीसीसीआयच्या त्या निर्णयावर भडकले गावसकर

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयकडून यो-यो चाचणी आणि डेक्सा स्कॅन अनिवार्य करण्यावर सडकून टीका केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 9 जानेवारी : बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच भारतीय संघात निवडीसाठी खेळाडूंना यो-यो चाचणी आणि डेक्सा स्कॅन अनिवार्य केले होते. या दोन्ही चाचणीत पात्र ठरणाऱ्या खेळाडूंनाच भारतीय संघात येण्याची संधी मिळणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. आता भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी देखील यो-यो चाचणी आणि डेक्सा स्कॅन अनिवार्य करण्यावर सडकून टीका केली आहे. सुनील गावस्कर यांनी एका वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले,  अनेक वर्षांपूर्वी जेव्हा शारीरिक तंदुरुस्तीची क्रेझ सुरू झाली, तेव्हा आमच्याकडे दोन माजी संघसहकारी होते जे निवृत्त झाले आणि त्या हंगामात वेगवेगळ्या मालिकांसाठी संघ व्यवस्थापक झाले. हे दोघेही त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत तंदुरुस्त नव्हते.  याबाबत उदाहरण देताना गावसकर यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील एक जुना किस्सा सांगितला. ते म्हणाले, माझी स्थिती माहीत असूनही संघ व्यवस्थापकाने मला धावायला सांगितले. मी 15 मिनिट धावलो आणि दमलो. मग मी त्यांना सांगितले की जर तो सर्वाधिक धावांच्या आधारे प्लेइंग-इलेव्हन निवडणार असेल तर मला वगळा. हे ही वाचा  : स्टीव्ह स्मिथची बॉलिंग पाहून चक्रावला फलंदाज Video Viral यो-यो चाचणी आणि डेक्सा स्कॅनबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले, फिटनेस ही वैयक्तिक गोष्ट आहे. वेगवान गोलंदाजांना फिरकीपटूंपेक्षा वेगळ्या तंदुरुस्तीची आवश्यकता असते. फलंदाजांना त्याची सर्वात कमी गरज आहे. यात क्रिकेटचा फिटनेस अधिक महत्त्वाचा आहे, त्याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. तसेच यो-यो चाचणी आणि डेक्सा स्कॅन करणार असाल तर मग बीसीसीआयच्या निवड समितीमध्ये बायो मेकॅनिकल आणि बॉडी सायन्स तज्ज्ञ असायला हवेत असा टोमणा देखील गावसकर यांनी लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात