मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /श्रीलंकन बोर्डाचा खेळाडूंच्या फिटनेससाठी विचित्र नियम, ‘अनफीट’ खेळाडूंना मोजावी लागणार जबर किंमत

श्रीलंकन बोर्डाचा खेळाडूंच्या फिटनेससाठी विचित्र नियम, ‘अनफीट’ खेळाडूंना मोजावी लागणार जबर किंमत

Sri Lanka Cricket Board

Sri Lanka Cricket Board

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) खेळाडूंच्या फिटनेससाठी (fitnes) अनोखी शक्कल लढवली आहे.

नवी दिल्ली, 21 डिसेंबर: क्रिकेटमध्ये(Cricket) खेळाडूंच्या फिटनेसला पहिल्यापेक्षा अधिक महत्त्वा प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमिवर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) खेळाडूंच्या फिटनेससाठी (fitnes) अनोखी शक्कल लढवली आहे. खेळाडूंच्या फिटनेसबाबत श्रीलंका क्रिकेट बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनफीट खेळाडूंना जबर किंमत मोजावी लागणार. अशी चर्चा क्रिकेट जगतात सुरु आहे.

बोर्डने श्रीलंका संघातील क्रिकेटपटूंसमोर फिटनेसचे नवीन आव्हान ठेवले आहे. आता श्रीलंका संघातील खेळाडूंना यो-यो फिटनेस टेस्ट (yo-yo fitness test) पार करावी लागणार आहे.

खेळाडूंच्या तंदुरुस्तीसाठी कठोर नियमावली तयार केली आहे. एकतर पूर्णपणे तंदुरूस्त व्हा किंवा संघाबाहेर होण्यास तयार राहा, असे स्पष्ट संकेत निवड समितीनं खेळाडूंना दिले आहेत. श्रीलंका बोर्डानं करारबद्ध खेळाडूंना याबाबत माहिती दिली असून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्या अन्यथा पगार कपातीचा सामना करा, असे संकेत दिले आहेत.

या फिटनेस टेस्टमध्ये खेळाडूंना 2 किलोमीटर धावायचे आहे. जे खेळाडू हे दोन किलोमीटरचे अंतर 8.10मिनिटात पार करतील त्यांची संघात निवड केली जाऊ शकते आणि त्यांना आर्थिक नुकसानही होणार नाही. तर दुसरीकडे जे खेळाडू हे अंतर कापण्यासाठी 8.55 पेक्षा अधिक वेळ घेतील त्यांची संघात निवड केली जाणार नाही.

बोर्डच्या नियमांप्रमाणे ज्या खेळाडूंना हे 2 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी 8.35 ते 8. 55मिनिटे लागतील, त्यांना मिळणाऱ्या वेतनापैकी काही भाग बोर्ड कापून घेणार आहे आणि हे खेळाडूं संघात समील होऊ शकतात.

फिटनेसच्या बाबतीत कोणतीही हयगय नाही: श्रीलंका क्रिकेट बोर्ड

श्रीलंका निवड समितीचे प्रमुक प्रमोद्या विक्रमासिंघे या निर्णयासंदर्भात बोलताना म्हणाले, 'फेब्रुवारीपर्यंत 8.35 मिनिटांत जे खेळाडू 2 किमी अंतर पार करतील, ते पुढील टप्प्यासाठी म्हणजेच 8.10 मिनिटांच्या परीक्षेसाठी पात्र ठरतील. खेळाडूंनी त्यांच्या तंदुरुस्तीकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं, हा आमचा मानस आहे. असे सांगत, फिटनेसच्या बाबतीत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. असा गंभीर इशारादेखील विक्रमासिंघे यांनी यावेळी दिला.

ते पुढे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत खेळाडूंच्या तंदुरुस्तीत बरीच सुधारणा झाली आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दृष्टीने खेळाडूंनी स्वत:ला मजबूत बनवावे, अशी आमची इच्छा आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, Fitness test, Sri lanka