नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Birthday) आज, शुक्रवारी (17 सप्टेंबर) 71 वर्षांचे झाले. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक भारतीय खेळाडूंनी (Indian Sport persons wishes PM Modi birthday) त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. बॅडमिंटनपटू साईना नेहवालने (Saina Nehwal birthday wishes to PM Modi) ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. ‘प्रिय नरेंद्र मोदी सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! तुम्ही जन्मजात नेतृत्वगुण असलेले आणि एकमेवाद्वितीय गुण असलेले नेते आहात. तुम्ही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहात,’ असं तिने लिहिलं आहे.
वेटलिफ्टर साईकोम मिराबाई चानूनेही (Saikhom Mirabai Chanu) ट्विट केलं आहे. ‘आमचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. देशासाठी तुमची असलेली समर्पण भावना आणि दृष्टिकोन यातून आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळत राहील. तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, ही प्रार्थना,’ असं तिने लिहिलं आहे.
Happy birthday to our Prime Minister, Shri @narendramodi sir. Your dedication and vision towards the country will keep inspiring us. I pray for your long & healthy life. pic.twitter.com/X7bo9I2fJF
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) September 17, 2021
टेनिसपटू अंकिता रैनाने (Ankita Raina) ट्विटमध्ये लिहिलं आहे, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुमच्या कायमच मिळत असलेल्या साह्याबद्दल आभार. तुमच्याशी काही वेळा संवाद साधण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य. भारतीय खेळाडूंना तुमचा कायमच आधार आणि साह्य असतं. तुम्हाला आरोग्यपूर्ण आणि संपन्न आयुष्य लाभो, या सदिच्छा.’
भारतीय हेप्टॅथलिट स्वप्ना बर्मननेही (Swapna Barman) ट्विटद्वारे पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
1950 साली गुजरातमध्ये जन्मलेल्या नरेंद्र मोदी यांनी कमी वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) प्रवेश केला आणि तिथून ते नंतर भारतीय जनता पक्षात (BJP) आले. 2001मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वतःची उत्तम प्रतिमा बनवली आणि ते लोकप्रिय नेते बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरात राज्यात सलग तीन वेळा भाजपचं सरकार आलं आणि ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर देशात आलेल्या मोदी लाटेने 2014 साली ते देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर देशभरातली त्यांची लोकप्रियता आणखी वाढली आणि 2019लाही ते पुन्हा एकदा पंतप्रधान बनले आहेत.
2024 ला पण तुम्हीच पंतप्रधान…. कंगनाच्या नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छापंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 71वा वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने 20 दिवसांचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. सेवा और समर्पण असं त्या कार्यक्रमाचं नाव असून, तो कार्यक्रम 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि पंतप्रधान म्हणून अशा त्यांच्या एकंदर कारकिर्दीला वीस वर्षं झाली आहेत. त्याचं औचित्यही या कार्यक्रमाला आहे. भारतीय जनता पक्षाने या निमित्ताने कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला साह्य करण्याचं, लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही कार्यकर्त्यांना केलं आहे. भारताने 77 कोटी जणांना लसीकरणाचा टप्पा नुकताच ओलांडला आहे.