दरम्यान कंगनाने अनेकदा राजकीय वक्तव्य देखील केली आहेत. तर अनेकदा पंतप्रधान मोदींच्या अनेक निर्णयाच स्वागत करताना ती दिसली आहे. तसेच मोदी हे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असल्याचं तिने एकदा म्हटलं होतं. तर आता तिसऱ्यांदा ही मोदींनीच देशाचे पंतप्रधान व्हावे अशी तिने इच्छा व्यक्त केली आहे.
इतर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, करण जोहर, हेमा मालिनी, मनिष मल्होत्रा, रणदीप हुडा, रकुल प्रीत सिंगसह अनेक सेलिब्रिटींनी त्यांना बर्थडे विश केलं आहे.View this post on Instagram
कंगनाच्या 'सीता' चित्रपटात रणवीरची वर्णी; खिलजीनंतर आता साकारणार रावण
दरम्यान नेहमीच चर्चेत राहणारी कंगना सध्या विशेष चर्चेत आहे कारण नुकताच तिचा थलायवी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर तिच्या आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा देखील झाली आहे. ‘द इनकार्नेशन – सीता’ या चित्रपटात ती सीता या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.