मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IOA Election : पीटी उषानं रचला इतिहास, भारतीय ऑलिम्पिकची सांभाळणार जबाबदारी

IOA Election : पीटी उषानं रचला इतिहास, भारतीय ऑलिम्पिकची सांभाळणार जबाबदारी

भारताच्या महान धावपटू आणि माजी ऑलिंपिक खेळाडू पी. टी. उषा यांनी निवडणुकीत इतिहास रचला आहे.

भारताच्या महान धावपटू आणि माजी ऑलिंपिक खेळाडू पी. टी. उषा यांनी निवडणुकीत इतिहास रचला आहे.

भारताच्या महान धावपटू आणि माजी ऑलिंपिक खेळाडू पी. टी. उषा यांनी निवडणुकीत इतिहास रचला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली , 28 नोव्हेंबर :  भारताची महान धावपटू आणि माजी ऑलिंपिक खेळाडू पी. टी. उषा या निवडणुकीत इतिहास रचला आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) 95 वर्षांच्या इतिहासात पी. टी. उषा या संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होणार आहेत. याशिवाय, उषा आयओए प्रमुखपद भूषवणाऱ्या पहिल्या ऑलंपियन आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडू असतील. उषा सध्या राज्यसभेच्या खासदारही आहेत. ‘

    उषा यांनी आयओएच्या सर्वोच्च पदासाठी उमेदवारी दाखल केला आहे . एम. सी. मेरी कोम यांच्या नेतृत्वाखालील आयओएच्या कमिशननं निवडलेल्या आठ 'स्पोर्ट्सपर्सन ऑफ आउटस्टँडिंग मेरिट'मध्ये (SOMs) उषा यांचा समावेश आहे. अनेक आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक विजेत्या 58 वर्षीय उषा यांनी आयओए अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करणाऱ्या एकमेव उमेदवार आहेत. त्यामुळे उषा ज्यांची बिनविरोध निवड होणार आहे.

    याशिवाय, रिटर्निंग ऑफिसर उमेश सिन्हा यांना शुक्रवार आणि शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दोन दिवसांत एकही अर्ज मिळाला नाही. मात्र, रविवारी आयओएतील विविध पदाधिकाऱ्यांच्या जागांसाठी 24 उमेदवारांनी अर्ज केले.

    Video : केस कापतानाही मिस होणार नाही फुटबॉलची मजा, पाहा 'लय भारी' आयडिया!

    उषा यांना या वर्षी जुलैमध्ये भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली होती. उषा यांच्या बिनविरोध निवडीबद्दल भारतीय जनता पक्षातील (भाजप) अनेक राजकारण्यांनी ट्विटरवर त्यांचं अभिनंदन केलं. यामध्ये माजी केंद्रीय क्रीडा मंत्री आणि सध्याचे कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचाही समावेश आहे. "भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिग्गज गोल्डन गर्ल, श्रीमती पी. टी. उषा यांचं अभिनंदन. प्रतिष्ठित आयओएचे पदाधिकारी झाल्याबद्दल मी आपल्या देशातील सर्व क्रीडा नायकांचं अभिनंदन करतो! देशाला त्यांचा अभिमान आहे," अशा शब्दांत किरेन रिजिजू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

    'पायोली एक्स्प्रेस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पी. टी. उषा या देशासाठी सर्वोच्च स्तरावर खेळणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू आणि आयओए प्रमुख ठरतील. या पूर्वी, 1934 मध्ये एक क्रिकेट कसोटी सामना खेळलेले महाराजा यादवेंद्र सिंह आयओए प्रमुख झाले होते. जवळपास दोन दशकं भारतीय आणि आशियाई अॅथलेटिक्समध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर 2000 मध्ये उषा निवृत्त झाल्या होत्या.

    काय सांगता? एकाच ओव्हरमध्ये 7 सिक्स! अशी कामगिरी करणारा पुण्याचा ऋतुराज जगातील पहिला खेळाडू

    उषा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 11 पदकं जिंकलेली आहेत. यामध्ये, 1986 च्या सोल एशियन गेम्समध्ये चार सुवर्ण, तर 1983 ते 1998 या कालावधीत आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 14 सुवर्णांसह 23 पदकं जिंकलेली आहेत. लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिल्यामुळे उषा यांना कांस्यपदक गमवावं लागलं होतं.

    आयओएच्या इतर पदांबद्दल बोलायचं झाल्यास, गुजरात राज्य सहकारी बँक आणि अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष अजय पटेल हे वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवडून येणार आहेत. कारण, या पदासाठी अर्ज करणारे ते एकमेव उमेदवार आहेत. ते सध्या गुजरात स्टेट रायफल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे, भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे (IWLF) अध्यक्ष, सहदेव यादव यांची आयओएच्या कोषाध्यक्षपदी निवड होणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (AIFF) अध्यक्ष कल्याण चौबे हे पुरुष सहसचिव म्हणून निवडले जाणार आहेत.

    अफगाणिस्तान टीमला मिळालं नवं घर.... पुढची 5 वर्ष अफगाणिस्तानसाठी 'हे' आहे होम ग्राऊंड

    अलकनंदा अशोक, शालिनी ठाकूर चावला आणि सुमन कौशिक यांच्यात महिला सहसचिवपदासाठी लढत होणार आहे. पुरुष उपाध्यक्ष पदासाठी, लंडन ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंग एसओएमनं निवडलेला एकमेव उमेदवार आहे. राजलक्ष्मी सिंह देव आणि अलकनंदा अशोक या दोन उमेदवारांनी आईस प्रेसिडेंटपदासाठी (महिला) अर्ज दाखल केले आहेत.

    First published:

    Tags: Olympic, Sports