मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Pro Kabaddi League: पुणेरी पलटण समोर 'बाहुलबली'चं आव्हान! कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming?

Pro Kabaddi League: पुणेरी पलटण समोर 'बाहुलबली'चं आव्हान! कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming?

प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabddi League) आज (शनिवारी) तीन सामने आहेत. यामध्ये पहिल्या मॅचमध्ये फार कमाल करू न शकलेल्या पुणेरी पलटणला (Puneri Paltan) विजयाची संधी आहे.

प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabddi League) आज (शनिवारी) तीन सामने आहेत. यामध्ये पहिल्या मॅचमध्ये फार कमाल करू न शकलेल्या पुणेरी पलटणला (Puneri Paltan) विजयाची संधी आहे.

प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabddi League) आज (शनिवारी) तीन सामने आहेत. यामध्ये पहिल्या मॅचमध्ये फार कमाल करू न शकलेल्या पुणेरी पलटणला (Puneri Paltan) विजयाची संधी आहे.

मुंबई, 25 डिसेंबर : प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabddi League) आज (शनिवारी) तीन सामने आहेत. यामध्ये पहिल्या मॅचमध्ये फार कमाल करू न शकलेल्या पुणेरी पलटणला (Puneri Paltan) विजयाची संधी आहे. हा विजय मिळवण्यासाठी त्यांना सिद्धार्थ बाहुलबली देसाईचा (Siddarth Desai) अडथळा पार करावा लागणार आहे. सिद्धार्थ हा तेलुगू टायटन्स (Telugu Titans) मुख्य रेडर आहे. त्याला रोखण्यासाठी पुण्याची टीम काय योजना बनवेल यावर या मॅचचं भवितव्य ठरेल. पुणेरी पलटणचा पहिल्या मॅचमध्ये दबंग दिल्ली विरुद्ध पराभव झाला होता. तर तेलुगु टायटन्स आणि तामिळ थलयवाजची मॅच बरोबरीत सुटली होती.

प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम असलेली पाटणा पायरेट्स देखील शनिवारी मॅटवर उतरणार आहे. पाटणासमोर यूपी योद्धाचं आव्हान असेल. तर तिसरी लढत जयपूर पिंक पँथर्स आणि हरियाणा स्टीलर्स या दोन टीममध्ये होणार आहे. शनिवारी मॅटवर उतरणाऱ्या 6 टीमपैकी फक्त पाटणा पायरेट्सनं पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे अन्य पाच टीमना विजयाच्या ट्रॅकवर परतण्याचा संधी या मॅचमध्ये आहे.

Pro Kabaddi League: दिल्ली ठरली मुंबईवर 'दबंग', पिछाडीनंतरही दिला धक्का

PKL 8 मध्ये 25  डिसेबर रोजी किती सामने आहेत?

पीकेएल-8 मध्ये 25 डिसेंबर रोजी 3 सामने होणार आहेत. यामधील पहिला सामना पाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात होईल. दुसरा सामना पुणेरी पलटण विरुद्ध तेलुगु टायटन्स तर तिसरा सामना जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध हरियणा स्टीलर्स यांच्यात होणार आहे.

PKL 8 मधील आजचे सामने कधी सुरू होतील?

आज तीन सामने आहेत. पहिला सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. दुसरा त्यानंतर बरोबर एक तासांनी सुरू होईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना रात्री 9.30 वाजता खेळला जाणार आहे.

PKL 8 मधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?

भारतामध्ये या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण 'स्टार स्पोर्ट्स नेटवर्क' वर पाहता येणार आहे.

PKL 8 चे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

डिस्नी+हॉटस्टार ऍप आणि वेबसाईट कबड्डी मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

First published:
top videos

    Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league