जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनचा घराच्या गच्चीवर संशयास्पद मृत्यू

धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनचा घराच्या गच्चीवर संशयास्पद मृत्यू

धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनचा घराच्या गच्चीवर संशयास्पद मृत्यू

ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेतील चॅम्पियन श्रृती सोनी हिचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला आहे. शुक्रवारी तिच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात येणार असून त्यानंतरच तिच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बैतुल (मध्य प्रदेश), 1 ऑक्टोबर : ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेतील चॅम्पियन श्रृती सोनी  हिचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला आहे. (Junior badminton champion Shruti Soni found dead at her home) मध्य प्रदेशातील बैतूलमधील तिच्या घराच्या गच्चीवर तिचा मृतदेह आढळला. 17 वर्षांच्या श्रृतीनं 12 वेळा नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेतला होता.तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार श्रृती घराच्या गच्चीवर गर्भवती मांजरीला आराम मिळावा म्हणून तिच्यासाठी घर तयार करण्यासाठी गेली होती. ती अर्ध्या तासानंतरही खाली आली नाही, त्यावेळी आईनं गच्चीवर जाऊन पाहिले, त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर श्रृतीला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथं तिला मृत घोषित करण्यात आले. Womens Cricket vs Mens Cricket : महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये असतात हे 7 फरक, तुम्हाला माहिती आहेत का? येथील सेंट्रल शाळेची विद्यार्थीनी असलेली श्रृती याच वर्षी 12 वी पास झाली होती. तिच्या शरिरावर कोणत्याही जखमा आढळलेल्या नाहीत. शुक्रवारी तिच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात येणार असून त्यानंतरच तिच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात