मुंबई, 30 सप्टेंबर : भारतीय महिला टीम आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (India Women vs Australia Women) पिंक बॉल टेस्टला सुरुवात झाली आहे. 2021 मध्ये दुसऱ्यांदा भारतीय महिला टीम टेस्ट मॅच खेळत आहे. पुरुष टीमच्या तुलनेत महिला टीम खूपच कमी टेस्ट मॅच खेळतात. 14 वर्षांमध्ये दुसऱ्यांदाच भारतीय टीम एकाच वर्षात दोन टेस्ट खेळत आहे. भारतीय पुरुष टीम मात्र वर्षाला जवळपास 8-10 टेस्ट खेळते. पुरुष आणि महिला टीमच्या टेस्ट मॅचच्या नियमांमध्ये मात्र बराच फरक असतो. या दोन्ही टेस्ट मॅचमधल्या 7 वेगवेगळ्या नियमांबद्दल माहिती घेऊया.
- महिला क्रिकेटपटूंची टेस्ट मॅच 4 दिवसांची असते, तर पुरुषांची टेस्ट मॅच 5 दिवसांची असते.
- महलि क्रिकेट टेस्ट मॅचमध्ये प्रत्येक दिवसाला 100 ओव्हरची बॉलिंग करणं गरजेचं असतं, पण पुरुष क्रिकेटमध्ये 90 ओव्हरचा खेळ होणं अनिवार्य आहे.
- महिला क्रिकट टेस्टमध्ये बॉलचं वज 142 ग्रॅम असलं पाहिजे, पण पुरुषांच्या मॅचमध्ये बॉलचं वजन 156 ग्रॅमपेक्षा कमी असता कामा नये.
- महिला टेस्ट मॅचमध्ये बाऊंड्री कमीत कमी 55 मीटर आणि जास्तीत जास्त 64 मीटर असू शकते, तर पुरुषांच्या टेस्ट मॅचमध्ये हे अंतर 59 मीटर आणि 82 मीटर असावं, असा नियम आहे.
- महिला टेस्टमध्ये डीआरएसचा वापर केला जात नाही. मैदानातला अंपायर तिसऱ्या अंपायरची मदत घेऊ शकतो. पुरुष क्रिकेटमध्ये - डीआरएसचा वापर केला जातो आणि खेळाडू मैदानातल्या अंपायरने दिलेल्या निर्णयाला आव्हान देऊ शकतो.
- महिला टेस्ट मॅचमध्ये एक ओव्हर करायला 3.6 मिनिटांची वेळ दिलेली असते, तर पुरुषांच्या टेस्टमध्ये हीच वेळ 4 मिनिटं आहे.
- खेळाडूंसाठी मैदानाबाहेर राहण्यासाठी पेनल्टी टाईमही वेगवेगळा आहे. महिला टेस्ट मॅचमध्ये ही वेळ 110 मिनिटं आणि पुरुषांच्या सामन्यात 120 मिनिटं असू शकते.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.