जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / भारतीय बॅडमिंटनचे महर्षी हरपले! नंदू नाटेकर यांचं निधन

भारतीय बॅडमिंटनचे महर्षी हरपले! नंदू नाटेकर यांचं निधन

भारतीय बॅडमिंटनचे महर्षी हरपले! नंदू नाटेकर यांचं निधन

दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर (Nandu Natekar) यांचं निधन झालं आहे. ते 88 वर्षांचे होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 28 जुलै: दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन झालं आहे. ते 88 वर्षांचे होते.अर्जुन पुरस्कार मिळवलेले ते पहिले खेळाडू होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्या दशकात क्रीडा क्षेत्र गाजवलेल्या खेळाडूंमध्ये नाटेकर यांचा समावेश होता. नाटेकर यांनी राष्ट्रीय ज्यूनिअर टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेचे त्यांनी उपविजेतेपद देखील पटकावले होते. टेनिस आणि बॅडमिंटन या दोन्ही खेळावर समान प्रभुत्व असलेल्या नाटेकर यांनी नंतर करिअर म्हणून बॅडमिंटनची निवड केली. सांगलीमध्ये जन्म झालेल्या नाटेकर यांनी वयाच्या 20 व्या वर्षी 1953 साली सर्वप्रथम देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1954 मध्ये त्यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली होती. विदेशात बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी 1956 साली मलेशियातील स्पर्धेत ही ऐतिहासिक कामगिरी केली. Tokyo Olympics : सिंधूची मेडलची आशा कायम, सलग दुसऱ्या मॅचमध्ये विजय नाटेकर यांनी थॉमस कप स्पर्धेतही ठसा उमटवला होता. या स्पर्धेतील एकेरीच्या 16 पैकी 12 तर दुहेरीच्या 16 पैकी 8 लढती त्यांनी जिंकल्या.  या स्पर्धेत त्यांनी तीन वेळा भारताचे नेतृत्त्व देखील केले होते. बॅडमिंटन क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना 1961 साली अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले क्रीडापटू होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: sports
  • First Published :
जाहिरात
जाहिरात