मुंबई, 20 मार्च : वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल जिंकणारा भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं (Lakshya Sen) आणखी एका स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. लक्ष्यनं ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये गतविजेता मलेशियन खेळाडू के ली जी जियाचा पराभव करत फायनल (All England Championships Final) गाठली आहे. 20 वर्षांचा हा तरूण खेळाडू या स्पर्धेची फायनल गाठणारा पाचवा भारतीय आहे. यापूर्वी प्रकाश नाथ, प्रकाश पादुकोण, पुलेला गोपीचंद आणि सायना नेहवाल यांनी या भारतीयांनी स्पर्धेची फायनल गाठली आहे. लक्ष्यनं 1 तास 16 मिनिटं झालेल्या सेमी फायनलमध्ये लीचा 21-13, 12-21 आणि 21-19 असा पराभव केला. यापूर्वी 2001 साली पुलेला गोपीचंद (Pullela Gopichand) यांनी ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी भारताच्या पुरूष बॅडमिंटनपटूनं या स्पर्धेची फायनल गाठली आहे. लक्ष्य सेननं या मॅचनंतर सांगितलं की, ‘मी नर्व्हस होतो. पण मी फक्त मॅचचा विचार करत होतो. ही ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपची सेमी फायनल होती. मनात अनेक विचार येत होते, पण तरीही मी मॅचवर फोकस कायम ठेवले. ही मॅच जिंकून आता मला फायनल खेळायला मिळणार आहे, याचा आनंद आहे.’ गेल्या 6 महिन्यांपासून फॉर्मात लक्ष्य सेन गेल्या 6 महिन्यांपासून फॉर्मात आहे. त्याने डिसेंबर 2021 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल जिंकले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात इंडिया ओपन सुपर 500 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तसंच मागच्या आठवड्यात झालेल्या जर्मन ओपन स्पर्धेचा तो उपविजेता होता. सेननं सहा वर्षांपूर्वी इंडिया इंटरनॅशनल सीरिजमध्ये लीचा पराभव केला होता. त्याने सेमी फायनलमध्येही भक्कम तंत्र आणि मानसिक कणखरतेचं उदाहरण देत इतिहास रचला. सेन आणि ली हे दोघंही 2016 साली बेंगळुरूतील प्रकाश पादुकोण अकादामीमधील एक्सचेंज कार्यक्रमाचा भाग होते. त्यामुळे त्यांना एकमेकांचा खेळ चांगलाच माहिती आहे.
Rising star Lakshya Sen 🇮🇳 continues his rock-solid run in Birmingham!
— BWF (@bwfmedia) March 17, 2022
Follow live action: https://t.co/TjoFnU4PnB@HSBC_Sport#BWFWorldTour #AllEngland2022 pic.twitter.com/PJGp1DkfLM
सेननं मलेशियाच्या ली विरूद्ध आक्रमक सुरूवात केली. त्याने पहिला गेम 21-13 असा सहज जिंकला. ली दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन केलं. त्याने सुरूवातीला 11-3 आणि नंतर 16-5 अशी आघाडी घेतली. त्यावेळी सेननं प्रतिकार करत सलग 5 पॉईंट जिंकले. पण दुसरा गेम जिंकण्यात त्याला अपयश आले. लीनं तो गेम 21-12 असा जिंकत मॅचमध्ये बरोबरी साधली. IPL टीम्सनी दुर्लक्ष केलेल्या सुरेश रैनाचा ‘या’ देशाच्या सरकारनं केला सन्मान तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरदार लढत दिली. लीने 11-9 अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी त्याने 16-12 अशी वाढवली. त्यानंतरही सेननं हार मानली नव्हती. त्याने निर्णयाक क्षणी गेमममध्ये पुनरागमन करत तो गेम 21-19 असा जिंकला.