मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Bollywood news: राज कुंद्राने शिल्पा शेट्टीच्या नावावर केले 5 फ्लॅट्स; किंमत थोडथोडकी नव्हे तर आहे 38.5 कोटी!

Bollywood news: राज कुंद्राने शिल्पा शेट्टीच्या नावावर केले 5 फ्लॅट्स; किंमत थोडथोडकी नव्हे तर आहे 38.5 कोटी!

Bollywood news: राज कुंद्राने सध्या राहात असलेल्या बंगल्यातील संपूर्ण पहिला मजला पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावावर ट्रान्सफर केला आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या पाच फ्लॅट्सचा समावेश आहे

Bollywood news: राज कुंद्राने सध्या राहात असलेल्या बंगल्यातील संपूर्ण पहिला मजला पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावावर ट्रान्सफर केला आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या पाच फ्लॅट्सचा समावेश आहे

Bollywood news: राज कुंद्राने सध्या राहात असलेल्या बंगल्यातील संपूर्ण पहिला मजला पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावावर ट्रान्सफर केला आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या पाच फ्लॅट्सचा समावेश आहे

  नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: गेल्या काही महिन्यांपासून राज कुंद्रा (Raj Kundra) आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) अनेक कारणांनी चर्चेत आहेत. राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात (Raj Kundra Pornography Case) अडकल्यानंतर या कपलची जोरदार चर्चा होती. त्यातच आता या कपलविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज कुंद्राने सध्या राहात असलेल्या बंगल्यातील संपूर्ण पहिला मजला पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावावर ट्रान्सफर केला आहे. मात्र याबाबत शिल्पा शेट्टीकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा कमेंट आलेली नाही. पहिल्या मजल्यावरील 5 फ्लॅटस राजने शिल्पा शेट्टीच्या नावावर ट्रान्सफर केले असून, त्याची किंमत सुमारे 38 कोटींपेक्षा अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. या व्यवहारामुळे हे कपल पुन्हा चर्चेत आलं आहे.

  उद्योगपती राज कुंद्राने त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नावावर 5 फ्लॅट (Flats) ट्रान्सफर केले आहेत. या फ्लॅटसची किंमत सुमारे 38.5 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. प्रॉपर्टी ट्रॅकिंग वेबसाइट zapkey.com वरील कागदपत्रांवरून ही माहिती मिळाली आहे. राज कुंद्राला गेल्या वर्षी एका पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला या प्रकरणात जामीन मिळाला होता.

  हे वाचा-Amitabh Bachchan यांनी इतक्या कोटीला विकलं आई-वडिलांचे घर

  राज कुंद्राचं खरं नाव रिपूसूदन कुंद्रा आहे. कुंद्राने त्याच्या 'किनारा' या बंगल्याचा संपूर्ण पहिला मजला शिल्पाच्या नावावर ट्रान्सफर केला असून, त्यात 5 फ्लॅटसचा समावेश आहे. सध्या हे कपल या किनारा बंगल्यातच वास्तव्यास आहे.

  हा बंगला मुंबईतील जुहू (Juhu) भागात गांधीग्राम रोडवर असून त्याचं क्षेत्रफळ 5995 स्क्वेअर फूट आहे. कागदपत्रानुसार, शिल्पा शेट्टीने या फ्लॅट ट्रान्सफरबदल्यात 1.9 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क (Stamp duty) भरले आहे आणि हा व्यवहार 21 जानेवारी 2022 रोजी झाला आहे. जुहू परिसरातील स्थानिक ब्रोकर्सच्या म्हणण्यानुसार, हे ट्रान्सफर अर्थात हस्तांतरण बाजारमूल्यानुसार झाले असून, या भागात हे बाजारमूल्य सुमारे 65000 रुपये स्क्वेअर फूट आहे. हा बंगला समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 300 मीटर अंतरावर आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडून या वृत्ताबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

  हे वाचा-रणविजयचा Rodies ला टाटा-बायबाय, हा बॉलिवूड अभिनेता करणार होस्ट!

  शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा 22 नोव्हेंबर 2009 रोजी विवाहबद्ध झाले. याआधी हे कपल अनेकदा एकत्र दिसले होते आणि अनेकदा ते चर्चेत होते. मात्र, राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यानंतर शिल्पा शेट्टी सध्या सार्वजनिक ठिकाणी जाणं किंवा राजसोबतचे फोटो शेअर करणं टाळत आहे. राज कुंद्रा देखील सध्या कोणत्याही सोशल मीडिया (Social Media) नेटवर्किंग साईट्स उपलब्ध नाही. पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यानंतर त्याने त्याचे सर्व सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले आहेत.

  First published:

  Tags: Cases, Fake stamping, Finance, Money, Porn sites, Porn video, Property, Raj kundra, Shilpa shetty